Weekend Ka Vaar: Bichukale वर Salman Khan बरसला, घरात घसून मारेन म्हणत दिली वॉर्निंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:36 IST2022-01-08T16:27:01+5:302022-01-08T16:36:11+5:30
कलर्सने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोनुसार, सलमान खान (Salman Khan) अभिजीत बिचकुलेला(Abhijit Bichukale) खडसावत म्हणतो, 'असल्या घाणेरड्या शिव्या देतात, जर तुमच्या कुटुंबाला कोणी अशा शिव्या दिल्या तर तुम्हाला कसे वाटेल?आज वार्निंग देतोय.

Weekend Ka Vaar: Bichukale वर Salman Khan बरसला, घरात घसून मारेन म्हणत दिली वॉर्निंग !
बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानचा (Salman Khan) राग पुन्हा एकदा अनावर झाल्याचे पाहायला मिळणार आहे. यावेळीही पुन्हा एकदा सलमानने घरातील अनेक सदस्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे चांगलीच शाळा घेतली. करण कुंद्रा (KaranKundra), उमर रियाझ(Umar Riyaz) यांच्याशिवाय सलमान खान अभिजित बिचुकलेलाही (Abhijit Bichukale ) चांगलेच फटकारताना दिसणार आहे.
नुकतेच कलर्सने रिलीज केलेला प्रोमो पाहून असे दिसते की, सलमान खान आज कोणालाच माफ करण्याच्या मूडमध्ये नाही.इतकेच नाही तर फिजिकल वॉयलेंसमुळे उमर रियाजला बिग बॉसच्या घरातून हाकलण्यात आले आहे. अशा प्रकारे घरातल्या स्पर्धकांनी केलेल्या कृत्याचा सलमान खान आज जाब विचारताना दिसणार आहे.
कलर्सने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोनुसार, सलमान खान अभिजीत बिचुकलेला खडसावत म्हणतो, 'असल्या घाणेरड्या शिव्या तू देसोत, जर तुमच्या कुटुंबाला कोणी अशा शिव्या दिल्या तर तुला कसे वाटेल ?आज फक्त वार्निंग देतोय.पुढच्या आठवड्यात केस पकडून घराबाहेर काढेन, तुला वाटेल मी फक्त बोलतोच आहे,घरात घुसून मारायलाही कमी करणार नाही. सलमान खानचा चढलेला आवाज बघून यानंतर अभिजीत लिव्हिंग एरियातून उठतो आणि बाहेर गेटच्या दिशेने जातो आणि माईकवर म्हणतो,'खड्डयात गेला शो, अशा शोमध्ये मला थांबायचे नाही, दार उघडा.'
याशिवाय सलमान खानने करण कुंद्रालाही खडसावले. सलमान खानने करण कुंद्राला सांगितले की, त्याने तेजस्वी प्रकाशला टास्कमध्ये साथ दिली नाही. सलमान खान म्हणतो की, करण नेहमी तेजस्वीला आणि उमरला सॉरी म्हणायला सांगतो, पण तो आणि उमर कधीच म्हणत नाहीत की चला आज तेजस्वीसाठी खेळू या. हे ऐकून तेजस्वी रडायला लागते, सलमान रागाने म्हणतो की बॉयफ्रेंड असूनही त्याने तेजस्वीला मदत केली नाही.आता आगामी भागात आणखी काय काय घडणार हे पाहणेही रंजक असणार आहे.