Bigg Boss 15 : OMG! 'बिग बॉस'चा आवाजही कोरोना पॉझिटिव्ह, सेटवरून आली शॉकिंग बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:51 PM2022-01-10T14:51:29+5:302022-01-10T14:52:54+5:30
Bigg Boss 15 : गेल्या काही दिवासांत मनोरंजनसृष्टीतील अनेकांना कोरोनाची बाधा झाली. बॉलिवूडसोबतच अनेक टेलिव्हिजन स्टारही कोरोनाबाधित होत आहेत. आता ‘बिग बॉस’ सारख्या शोला सुद्धा कोरोनानं ग्रासलं आहे.
Bigg Boss 15 : गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीनं मनोरंजन विश्वाचं कंबरडं मोडलंय. शूटींग बंद, चित्रपटगृह, नाट्यगृह सगळंच बंद असल्याने मनोरंजन विश्वाला मोठा आर्थिक फटका बसला. काही महिन्यांपूर्वी सर्व काही सामान्य होत असतानाच, आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवासांत मनोरंजनसृष्टीतील अनेकांना कोरोनाची बाधा झाली. बॉलिवूडसोबतच अनेक टेलिव्हिजन स्टारही कोरोनाबाधित होत आहेत. आता ‘बिग बॉस’ सारख्या शोला सुद्धा कोरोनानं ग्रासलं आहे. खुद्द ‘बिग बॉस’लाच कोरोना झाल्याची बातमी आहे.
होय, हिंदी बिग बॉसचा आवाज असलेले अतुल कपूर (Atul Kapoor) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ‘टेलिचक्कर’ने दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सेटवरील क्रु मेंबर्सचीही कोरोना चाचणी करण्यात आलीय.
काही दिवसांआधी बिग बॉस15 ची सदस्य देवोलिना भट्टाचार्जी हिच्यात कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे तिची कोरोना चाचणी झाली होती. अन्य स्पर्धकांचीही कोरोना टेस्ट झाल्याची चर्चा होती.
तुल कपूर कोण आहेत?
‘बिग बॉस’च्या अनेक सीझनला आवाज देणारे, अख्ख्या घराला आपल्या आवाजावर नाचवणारे अतुल कपूर हे अनेक वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतात.
ते 2002 ला या क्षेत्रात आले. या क्षेत्रात प्रस्थापित व्हायच्याआधी त्यांनी काही छोट्या-मोठ्या नोक-या देखील केल्या आहेत. सोनी टीव्हीने त्यांना 2003 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. मोना सिंगची ‘जस्सी जैसी कोई नही’ ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेच्या काही प्रोमोमध्ये अतुलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. त्यांनी आजवर अनेक पाश्चिमात्य देशातील मालिका, चित्रपटांना हिंदी भाषेत डब केले आहे.