Bigg Boss 16 : खुल्लमखुल्ला अब्दु रोजिकनं या अभिनेत्रीकडे व्यक्त केलं प्रेम, म्हणाला - I Love You...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 15:57 IST2022-10-19T15:56:28+5:302022-10-19T15:57:13+5:30
Bigg Boss 16 : सलमान खानच्या शो 'बिग बॉस १६' चा एक प्रोमो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अब्दू रोजिक घरातील एका अभिनेत्रीला आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे.

Bigg Boss 16 : खुल्लमखुल्ला अब्दु रोजिकनं या अभिनेत्रीकडे व्यक्त केलं प्रेम, म्हणाला - I Love You...
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस १६' (Bigg Boss 16) सध्या खूप चर्चेत आला आहे. या शोमध्ये स्पर्धकांच्या भांडणासोबतच खूप धमालही पाहायला मिळते. नुकतेच 'बिग बॉस १६' चा एक प्रोमो व्हिडिओ देखील रिलीज झाला आहे, ज्याने चाहत्यांना चकित केले आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये अब्दु रोजिक (Abdu Rozik) टीना दत्ता(Tina Dutta)ला आय लव्ह यू म्हणत होता. अब्दुच्या या गोष्टीचा शालीनला हेवा वाटू लागला आणि ती स्वतःही चकित झाली. 'बिग बॉस १६'च्या या प्रोमो व्हिडीओवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत, तसेच हा व्हिडिओ आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
'बिग बॉस १६' च्या प्रोमो व्हिडिओमध्ये अब्दू रोजिक टीना दत्तासोबत फ्लर्ट करताना दिसला होता, हे पाहून शालीन भनोटने त्याला विचारले, "काय होत आहे?" शालीनच्या बोलण्यावर टीनाने उत्तर दिले, "प्रेम होत आहे..." इतकंच नाही तर टीना दत्ताने शालीनसमोर अब्दू रोजिकला आय लव्ह यू म्हटलं, त्यावर अब्दू रोजिकने उत्तर दिलं, "माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे...." अब्दू रोजिक आणि टीना दत्ता यांचे फ्लर्ट पाहून शालीन भनोटही काही बोलू शकत नाही.
'बिग बॉस १६' चा प्रोमो पाहिल्यानंतर काही युजर्सनी टीना दत्तावर टीका केली. तर काही युजर्सनी सुंबुल तौकीर खानची खरडपट्टी काढली. एका युजरने टीना दत्ताची खिल्ली उडवली आणि लिहिले, "टीनाला अब्दूचे फुटेज हवे आहे." आणखी एका युजरने लिहिले, "ओव्हर अॅक्टिंग टीना...." एका युजरने अब्दूचे कौतुक करत लिहिले की, अब्दू खूप गोड आणि समजूतदार आहे.