Bigg Boss 16 Video : ‘बिग बॉस 16’च्या घरात रोमान्सचा तडका, सुरू झाली आणखी एक लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:13 PM2022-11-08T12:13:25+5:302022-11-08T12:14:23+5:30
Bigg Boss 16 :‘बिग बॉस 16’च्या घरात रोज नवे वाद होताना दिसतात. पण सध्या या घरात प्रेमाला उधाण आलं आहे. एकीकडे शालीन भनोट व टीना दत्ताच्या रोमान्समुळे हा शो चर्चेत आहे. दुसरीकडे आता आणखी एक लव्हस्टोरी बहरताना दिसतेय.
Soundarya Sharma-Gautam vij Romantic video : ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) घरात रोज नवे वाद होताना दिसतात. पण सध्या या घरात प्रेमाला उधाण आलं आहे. एकीकडे शालीन भनोट व टीना दत्ताच्या रोमान्समुळे हा शो चर्चेत आहे. दुसरीकडे आता आणखी एक लव्हस्टोरी बहरताना दिसतेय. होय, सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) व गौतम विज ( Gautam vij ) यांच्या रोमान्सची सध्या जोरदार चर्चा आहे.
बिग बॉसच्या घरातील सौंदर्या व गौतमचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात सौंदर्या गौतमच्या कुशीत बसून रोमॅन्टिक होताना दिसतेय. सौंदर्या व गौतम असे रोमॅन्टिक झालेले पाहून अब्दु व शिव दोघांनी त्यांची चांगलीच मजा घेतली.
कलर्स टीव्हीने नुकताच नव्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये गौतम आणि सौंदर्या इंटिमेट होताना दिसत आहेत. या प्रोमो व्हिडीओमध्ये सौंदर्या आणि गौतम एकमेकांत हरवले आहेत. तर दुसरीकडे नव्याने बनलेला कॅप्टन अब्दू आणि शिव ठाकरेसोबत मिळून त्या दोघांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सौंदर्यांची नक्कल करत अब्दुसुद्धा शिवच्या मांडीवर बसतो. दोघं एकमेकांना मिस करत आहेत. दोन-तीन तासांनंतर पुन्हा बाथरुममध्ये जाऊन किस करणार..., असं अब्दु म्हणतो आणि यानंतर अब्दु शिवला किस करत असल्याची नक्कल करतो.
दोघं बराच वेळ गौतम आणि सौंदर्याकडे वाकून-वाकून बघतात. शिवसुद्धा गौतमसारखा अभिनय करत दोघांची मस्करी करतो.
सध्या सौंदर्या व गौतमचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना गेल्या सीझनमधील इशान व मायराची आठवण झाली.
मागच्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानने सौंदर्यासमोर गौतमची पोलखोल केली होती. घरातील इतर स्पर्धक या दोघांच्या नात्याला बनावट आणि खोटं सांगत होते. त्याचदरम्यान सलमानने सौंदर्याला गौतमची एक क्लिप दाखवली होती. या क्लिपनंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांच्या जवळ आले आहेत. आता हे प्रेम किती दिवस टिकतं, ते बघूच...