Bigg Boss 16: बाबो! Abdu Rozik बिग बॉसच्या घरात घेऊन आला गोल्डन शूज, किंमत ऐकून सगळेच थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:33 PM2022-10-07T13:33:16+5:302022-10-07T13:35:03+5:30
Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आहेत. पण एक स्पर्धक मात्र चांगलाच भाव खाऊन जातोय. होय, लहानगा अब्दु रोजिक (Abdu Rozik) सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
Bigg Boss 16: ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन सुरू झाला आहे. यंदाचा सीझन अनेकार्थाने खास आहे. यावेळी स्पर्धकांसोबत बिग बॉस ही खेळाच्या मैदानात उतरल्याने या शोमध्ये वेगळीच मजा पाहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आहेत. पण एक स्पर्धक मात्र चांगलाच भाव खाऊन जातोय. होय, लहानगा अब्दु रोजिक (Abdu Rozik) सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. जगातील सर्वात छोटा गायक, ब्लॉगर, बॉक्सर असलेल्या अब्दुची उंची उणीपुरी 3.2 फूट आहे. तजाकिस्तानचा रहिवासी असलेला अब्दू त्याच्या प्रादेशिक भाषेत रॅप करतो. हा अब्दु सध्या त्याच्या गोल्डन शूजमुळे चर्चेत आहे.
बिग बॉस 16 चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात टीना दत्ता, गौतम विज, अंकित गुप्ता अब्दुचे गोल्ड शूज बघताना दिसतात. अब्दुचे सोन्याचे बूट पाहून सगळेच हैराण होतात. या शूजची किंमत ऐकून तर त्यांचे डोळे पांढरे होतात.
Chupa rahe hai Abdu apne gold ke shoes safely in his bag. Drop a 👟 in comment if aap bhi bann chuke ho inke jooto ke fan! 🥰
— ColorsTV (@ColorsTV) October 6, 2022
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16#BiggBoss@BeingSalmanKhanpic.twitter.com/ayKkyLE91w
हे शूज 40 हजार डॉलरचे (32 लाख 86 हजार) असल्याचं अब्दु सांगतो आणि ते ऐकून सगळेच शॉक्ड होतात. गौतम तर या शूजवरचा 24 कॅरेट गोल्ड स्टीकर काढण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून या शूजची किंमत 40 नाही 5 डॉलर असल्याचं अब्दु म्हणतो. यावर 5 डॉलरही कमी नाहीत, असं गौतम, अंकित म्हणतात. मग काय, अंकित, गौतम व टीनाचा इरादा काही ठीक नाही, हे पाहून अब्दु हळूच टीनाच्या हातून आपले शूज घेतो आणि आतमध्ये जाऊन आपल्या बॅगमध्ये शूज ठेवतो.
This clip is really a stress buster 😍 #TinaDatta ♥️🥺#Abdurozik#BiggBoss16pic.twitter.com/Ce04Sr0ENn
— Heisenberg 💫 (@heiisenberg11) October 3, 2022
अब्दु रोजिकला लहानपणापासून रिकेट्स नावाचा आजार आहे. त्यामुळे त्याची उंची वाढली नाही. अब्दु पाच वर्षांचा झाला आणि त्यानंतर त्याची वाढ खुंटली. त्याच्या हार्मोन्सचा विकास थांबला. तो लहान असताना त्याचया घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याच्या आई-वडिलांकडे त्याच्या उपचारासाठी पैसेही नव्हते. पण आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
तजाकिस्तानचा हा अब्दू आज जागतिक सेलिब्रिटी स्टार झाला आहे. त्याच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे. जगातील सर्वात लहान लोकप्रिय गायक ही ओळख मिळवण्यासाठी अब्दुने खूप कष्ट घेतले. रॅप साँगसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्दुने त्याच्या टॅलेंटने लाखो फॅन्स कमावले. त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर त्याचे अडीच मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अब्दुचं ‘ओही दिली झोर’ हे गाणं जगातील संगीतप्रेमींनी डोक्यावर घेतलं.