Shiv Thakare : रिक्षा, बसने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची कार, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 03:42 PM2023-03-07T15:42:39+5:302023-03-07T15:46:54+5:30

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरेला लॉटरी लागली.

Bigg boss 16 fame Shiv Thakare buy his new car | Shiv Thakare : रिक्षा, बसने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची कार, म्हणाला..

Shiv Thakare : रिक्षा, बसने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची कार, म्हणाला..

googlenewsNext

'बिग बॉस १६'मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या जाम चर्चेत आहे. 'बिग बॉस १६' च्या ट्रॉफीनं शिव ठाकरेला हुलकावणी दिली. पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र तो यशस्वी झाला. 'बिग बॉस १६'नंतर शिव लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. 


शिव  लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १३'मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. कंगना राणौतच्या 'लॉकअप २' या शोमध्येही तो झळकणार, अशी चर्चा आहे.  'बिग बॉस १६'ची ट्रॉफी शिवने जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण तसं झालं नाही. 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी  मिळाली नसली तरीही त्याच्या वाट्याला सलमान खानचा एक मोठा चित्रपट आला असल्याचं कळतंय.

'बिग बॉस १६'नंतर शिवचं नशीब उडलं. रिक्षा,बस किंवा ट्रेन प्रवास करणाऱ्या शिवने त्याची पहिली नवी कोरी कार खरेदी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने याबाबत पहिल्यांदाच सांगितलं. तुझं आयुष्य आता कसं बदललं? असं शिवला विचारण्यात आलं.

यावेळी बोलताना शिव म्हणाला,'' माझं आयुष्य आता नक्कीच बदलले आहे. मी आता स्वत:ची गाडीही बूक केली आहे. खरं तरं हे सरप्राईज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे. एका कामासाठी मी घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या मित्राला म्हटलं, तुझं काम असलं तर तू कार नको घेऊन येऊस, मी माझ्या कामासाठी रिक्षाने जातो. कारण मी माझ्या मित्राच्या कारने प्रवास करतो. रिक्षाने जात असताना मला बघून अनेकजण थांबत होते. मला हे सगळं आवडतं. ‘बिग बॉस मराठी’नंतरही आयुष्य बदललं. पण आता त्यापेक्षाही अधिक आयुष्य बदललं आहे”. शिवचं गाडी खरेदी करण्याचं आणखी एक स्वप्नाची आता पूर्ती झाली आहे.

Web Title: Bigg boss 16 fame Shiv Thakare buy his new car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.