Bigg Boss 16 House Photos: ‘बिग बॉस 16’मध्ये असणार चार बेडरूम, ही असेल थीम; समोर आले ‘बीबी हाऊस’चे इनसाईड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 05:28 PM2022-09-29T17:28:15+5:302022-09-29T17:30:06+5:30
Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता आहेच. पण या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नवं काय दिसणार? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. तर आता त्याचेही अपडेट समोर आले आहेत.
Bigg Boss 16 House Photos: छोट्या पडद्यावरचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरला या शोचा ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. ‘बिग बॉस 16’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता आहेच. पण या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नवं काय दिसणार? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. तर आता त्याचेही अपडेट समोर आले आहेत.
होय, पहिला मोठा बदल म्हणजे, यावेळी ‘बिग बॉस’ स्वत: शोमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय या सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धक असणार आहेत. इतकंच नाही तर, हे सीझन आणखी एका कारणानं वादळी ठरण्याची शक्यता आहे. होय, बिग बॉसच्या इतिहासात प्रथमच बीबी हाऊसमध्ये चार बेडरूम असणार आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस 16’च्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
Bigg Boss 16 Bedroom : Cards Room and Black & White Room#BiggBoss_Takpic.twitter.com/XoBzHg8NRL
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) September 29, 2022
‘बिग बॉस’चं घर दरवेळी अनोख्या पद्धतीने, वेगवेगळ्या थीमनुसार सजवण्यात येतं. या सीझनची थीम सर्कस असल्याचं कळतंय. ‘बिग बॉस 16’च्या घराचे जे फोटो समोर आले आहेत, त्यावरूनही हेच दिसतंय.
Bigg Boss 16 House Tagline - "Welcome to the CIRCUS" 🎪 #BiggBoss_Takpic.twitter.com/yHbBQUwr0V
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) September 29, 2022
EXCLUSIVE- First Look of Bigg Boss 16 House
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) September 29, 2022
House Theme is Circus 🎪
Open images for more pictures #BiggBoss_Takpic.twitter.com/RjUmTopEJA
‘बिग बॉस 16’च्या मेन गेटवर ‘वेलकम टू द स्’ असं लिहिलेलं दिसतंय. घरातील लिव्हिंग रूम प्रचंड प्रशस्त आणि आकर्षक आहे. सर्कस ही थीम असल्यामुळे संपूर्ण घराचा नजारा असाच आहे. इंटिरिअर डिझाईन सर्कस थीमवर बेतलेलं आहे.
Bigg Boss 16 House Enterance & Living Room #BiggBoss_Takpic.twitter.com/BMr7ZGf6Zc
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) September 29, 2022
Living area of #BiggBoss16 house! This is lpoking so beautiful!! #SalmanKhan
— 𝓝𝓲𝓶𝓻𝓲𝓽 𝓚𝓪𝓾𝓻 𝓐𝓱𝓵𝓾𝔀𝓪𝓵𝓲𝓪 👑 (@NimritAdmirers) September 29, 2022
Maximum RTs For The House! pic.twitter.com/sxfnhnSgUA
Bigg Boss 16 House First look #BiggBoss16#MunawarWarriors#MunawarFaruquipic.twitter.com/lNeILSFqX3
— Bigg Boss 16 live (@Biggboss16live) September 29, 2022
बेडरूमचे फोटोही समोर आले आहेत. चर्चा खरी मानाल तर पहिल्यांदा ‘बिग बॉस 16’मध्ये एक दोन नाही तर चार बेडरूम असणार आहेत. याआधीच्या सीझनमध्ये एक मोठ्ठ बेडरूम असायचं आणि याठिकाणी अनेक बेड्सची सोय केलेली असायची. गेल्या सीझनमध्ये डबल व सिंगल बेड्सवरून स्पर्धक भांडताना दिसले होते. यावेळी मेकर्सनी चार बेडरूम बनवले आहेत. पण यावेळीही बेड्सवरून स्पर्धकांमध्ये भांडणं होणार, हे नक्की मानलं जातंय.