mc stan च्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये? चाहत्यांनी खर्च केले हजारो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:17 IST2023-03-06T16:15:43+5:302023-03-06T16:17:14+5:30
Mc stan: अलिकडेच मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे.

mc stan च्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये? चाहत्यांनी खर्च केले हजारो रुपये
आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी खासकरुन ओळखला जाणारा एमसी स्टॅन (mc stan) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस 16’ (bigg boss 16) चा ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. अलिकडेच मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील लहानशा वस्तीत लहानाचा मोठा झालेल्या एमसी स्टॅनने सध्या लोकप्रिय रॅपर म्हणून देशभरात ओळखला जात आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यामुळेच आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने भारत टूरला सुरुवात केली आहे. देशातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये तो कॉन्सर्ट करणार आहे. याची सुरुवात मुंबईपासून झाली.
किती आहे एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टची फी
मुंबईपासून सुरु झालेला एमसी स्टॅनच्या या कॉन्सर्टसाठी चाहते हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. रविवारी (५ मार्च) मुंबईत स्टॅनचं पहिलं कॉन्सर्ट पार पडलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत.
या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत ८०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत होती. यात व्हिआयपी झोनचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना स्टेज जवळ उभं राहून कॉन्सर्ट पाहता आला. विशेष म्हणजे या तिकीटांसोबत दोन बिअरही मोफत देण्यात आल्या.