Bigg Boss 16 : अरे आवरा रे, लाज बाळगा...., शालीन-टीनाचा ‘फेक’ रोमान्स पाहून घरातले स्पर्धक बिथरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:13 PM2023-01-02T12:13:15+5:302023-01-02T12:15:32+5:30
Bigg Boss 16 New Promo Video : एमसी स्टॅनच्या कॉन्सर्ट दरम्यान टीना व शालीन इतके रोमँटिक झाले की त्यांना कुणाचं भान राहिलं नाही. टीना व शालीनच्या चाहत्यांना दोघांचा हा रोमान्स आवडलेला. पण अनेकांचं हा रोमान्स पाहून माथं ठणकलं...
Bigg Boss 16 New Promo Video : टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस 16’मध्ये न्यू ईअरचं जंगी सेलिब्रेशन झालं. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बिग बॉसच्या सदस्यांना जकूझी बाथटबचं सरप्राईज मिळालं. रात्री एमसी स्टॅनचा जबरदस्त कॉन्सर्ट झाला. साहजिकच घरातील सदस्यांनी धम्माल मस्ती केली. यावेळी टीना दत्ता आणि शालीन भनोटचा रोमान्सही पाहायला मिळाला. कॉन्सर्ट दरम्यान टीना व शालीन इतके रोमँटिक झाले की त्यांना कुणाचं भान राहिलं नाही. टीना व शालीनच्या (Shalin Bhanot And Tina Datta ) चाहत्यांना दोघांचा हा रोमान्स आवडलेला. पण अनेकांचं हा रोमान्स पाहून माथं ठणकलं. सध्या टीना व शालीन सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत. आता घरातील सदस्यांनीही टीना आणि शालीनचं प्रेम ‘टॉप लेव्हल फ्रॉड’असल्याचं म्हटलं आहे.
Promo:#ShivThakare#MCStan#NimritKaurAhluwalia#AbduRozik#PriyankaChaharChoudhary gives their view on #ShalinBhanot and #TinaDatta's relationship#BiggBoss#BiggBoss16#BB16pic.twitter.com/burIjrJ7BU
— 👀 (@daffodil_im) January 1, 2023
याचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओत घरातील सदस्य टीना व शालीनच्या नात्यावर बोलत आहेत. ‘लोकांसमोर असं बरं वाटतंय का? यांना जराही लाज नाहीये का?,’असं अर्चना म्हणाली. साजिद खानने हे दोघंही (टीना व शालीन) टॉप लेव्हलचे फ्रॉड लोक असल्याचं म्हटलं. एमसी स्टॅनने तर दोघांच्या प्रेमाची हवाच काढून टाकली. मला वाटतं, या दोघांना अनेक वर्षानंतर शो मिळाला आहे आणि म्हणून हे असं वागत आहेत, असं तो म्हणाला. निम्रीत कौर व प्रियंका यांनीही असंच मत नोंदवलं.
नेटकरी म्हणाले...
<3#TinaDatta#ShalinBhanot#shalina#ShaTina#BiggBoss16#BB16#biggboss#Livefeedpic.twitter.com/s8MFaEzLgV
— Naz (@kamlieditsx) December 30, 2022
नेटकऱ्यांनीही टीना व शालीन या दोघांना ट्रोल केलं. किती फेम वागणार? अरे आता बास्स...,अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अखेर या दोघांनी आपला खरा चेहरा दाखवलाच. आम्ही मित्र आहोत म्हणतात आणि असं वागतात, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. अरे ही नौटंकी बंद करा, अशा शब्दांत अनेकांनी दोघांना ट्रोल केलं.