Bigg Boss 16 : साजिद खानने अब्दुच्या पाठीवर लिहिला अश्लिल मॅसेज, पाहून नेटकरीच नाही तर सलमानही भडकला...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:50 PM2022-12-16T13:50:32+5:302022-12-16T13:51:20+5:30
Bigg Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये सतत राडे सुरू असतात. पण या आठवड्यात घरात असं काही घडलं की, सलमान खानही संतापला.
बिग बॉस 16 मध्ये (Bigg Boss 16 ) सतत राडे सुरू असतात. पण या आठवड्यात घरात असं काही घडलं की, सलमान खानही संतापला. इतका की, आज वीकेंड का वारमध्ये यावरून सलमान साजिद खानला ( Sajid Khan) चांगलंच फैलावर घेताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमो सलमान साजिदची शाळा घेताना दिसतोय. साजिदने केलं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याने अब्दु रोझिकची (Abdu Rozik) खिल्ली उडवली. साजिदने अब्दुच्या पाठीवर अश्लिल मॅसेज लिहिला. आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात...
तर या आठवड्यात बिग बॉसच्या घरात निम्रत कौर अहलुवालियाचा बर्थ डे साजरा झाला. अब्दुला निम्रतला चांगल्या पद्धतीने विश करायचं होतं. त्यामुळे त्याने साजिदला त्याच्या पाठीवर निम्रतसाठी एक सुंदर मॅसेज लिहिण्याची विनंती केली. आय लव्ह निम्रत, असं लिहिलंस तरी चालेल, असं अब्दु म्हणाला. पण साजिदने नेमकं उलट केलं. त्याने अब्दुच्या पाठीवर ‘आय लव्ह निम्रत’ ऐवजी ‘आय लव्ह xxx’ लिहिलं. अब्दुच्या पाठीवरचा हा मॅसेज पाहून घरातील सगळेच त्याची टिंगल उडवायला लागले. अब्दुला त्याचा पाठीवर लिहिलेल्या वाक्याचा अर्थ ठाऊक नव्हता. पण यावरून सोशल मीडियावरचे अब्दुचे चाहते भडकले. अब्दुच्या टीमनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली. अब्दुची अशाप्रकारे खिल्ली उडवणं अनेकांना आवडलं नाही. याबद्दल नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सलमानही यामुळे भडकला.
Finally #Salman is showing these bullies their place.
— Team Abdu Rozik Official FC 👑 (@Team_Abdu_Rozik) December 15, 2022
They think in the name of fun they can do anything.
Waiting for tomorrow's episode 🔥#AbduRozik#BB16pic.twitter.com/yIZSf4moUF
मला हे अजिबात आवडलेले नाही...
नुकताच ‘वीकेंड का वार’चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानसाजिद खानला फटकारताना दिसत आहे. सलमान खान साजिदला म्हणतो की, ‘वाढदिवसाच्या मेसेजसाठी तू अख्खा माणूस वापरला आहेस.’ यावर त्याला आय लव्ह निम्रत असे लिहून हवे होते, म्हणून मी आय लव्ह... केलं,असं साजिद म्हणतो आणि हसायला लागतो. साजिदचं हे हसणं पाहून सलमान खानचा पारा चढतो. ‘मला हे अजिबात आवडलेले नाही. यापुढे घरात कुणीही असं वागणार नाही. हे आताच थांबवा,’ अशा शब्दांत सलमान साजिदला तंबी देतो.