Bigg Boss 16 Promo : तू शालीनसाठी वेडी आहेस...., सलमानने पुन्हा एकदा घेतला सुम्बुलचा क्लास, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:26 PM2022-11-18T15:26:25+5:302022-11-18T15:28:44+5:30

Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar : गेल्या एपिसोडमध्ये शालीनवरून टीना व सुम्बुल दोघीही एकमेकींशी भांडताना दिसल्या. आज शुक्रवारी काय होणार? तर नेहमीप्रमाणे सुम्बुल सलमान खानच्या निशाण्यावर येणार...!

Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar Salman Khan Slams Sumbul Touqeer Saying She Is Obsessed With Shalin Bhanot | Bigg Boss 16 Promo : तू शालीनसाठी वेडी आहेस...., सलमानने पुन्हा एकदा घेतला सुम्बुलचा क्लास, पाहा प्रोमो

Bigg Boss 16 Promo : तू शालीनसाठी वेडी आहेस...., सलमानने पुन्हा एकदा घेतला सुम्बुलचा क्लास, पाहा प्रोमो

googlenewsNext

Bigg Boss 16  Promo Weekend Ka Vaar :  ‘बिग बॉस 16’ हा शो सध्या रंजक वळणावर आला आहे. रोज नवे राडे, नवे वाद सुरू आहेतच. सोबत बिग बॉसच्या घरातील प्रेमकथाही चर्चेत आहेत. गेल्या एपिसोडमध्ये शालीनवरून टीना व सुम्बुल दोघीही एकमेकींशी भांडताना दिसल्या. आज शुक्रवारी काय होणार? तर नेहमीप्रमाणे सुम्बुल सलमान खानच्या निशाण्यावर येणार...! होय, आज प्रसारित होणाऱ्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान पुन्हा एकदा सुम्बुलचा (Sumbul Touqeer) क्लास घेणार आहे.

आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून सुम्बुलच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसेल. प्रोमोमध्ये सगळे स्पर्धक अगदी नटूनथटून बसलेले आणि सलमान सुम्बुलचा क्लास घेताना दिसतोय.
सुम्बुलकडून सलमानला कदाचित मोठ्या अपेक्षा होत्या. तिच्याकडे तो विजेती म्हणून बघत होता. पण आता कदाचित सलमान निराश झाला आहे. त्याची ही निराशा प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसते.

‘ही शालीनसाठी ऑब्सेस्ड झाली आहे आणि ही गोष्ट शालीनलाही ठाऊक आहे,’असं सलमान सर्वांदेखत सुम्बुलला उद्देशून म्हणतो. सलमानचे हे तिखट शब्द ऐकून सुम्बुल रडायला लागते. नहीं सर, ये... असं ती म्हणते आणि नंतर काहीच न बोलता हात जोडून, मुझे घर जाना है... मुझे नहीं रहना है यहां पर..., असं म्हणते. सलमान यामुळे आणखीच चिडतो. चली जाओ, रोका किसने है आपको, असं म्हणत तो तिला फटकारतो.

शालीनचाही घेणार क्लास
सलमान शालीनचाही क्लास घेतो. शालीन भनोट (Shalin Bhanot) व एमसी स्टॅनच्या फिजिकल फाईटनंतर सलमान दोघांनाही फैलावर घेतो. पण याचदरम्यान शालीन असं काही बोलतो की सलमानचा पारा चढतो. घरात एक व्यक्ती स्वत:ला ब्रूस ली समजतोय, दुसरा स्वत:ला दारा सिंग समजू लागला आहे. एमसी स्टॅन, तू शिव्या घालतोस ना, मग दुसऱ्यांनी शिव्या दिल्यावर त्या ऐकायचीही हिंमत ठेव..., असं सलमान म्हणतो. यावर स्टॅन माफी मागतो. पण शालीन स्टॅनची माफी धुडकावून लावतो.

एकतर स्टॅन या घरातून जाईल किंवा मी, असं शालीन मोठ्या तोऱ्यात म्हणतो. हे ऐकून सलमान बिथरतो. यहां कोई किसी को रोक नहीं रहा है.., असं सलमान म्हणतो. ते ऐकून शालीन आपल्या जागेवरून उठतो. आता तो रागात घर सोडून जातो की नाही, हे तर येणारा एपिसोड पाहिल्यानंतरच कळेल.

Web Title: Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar Salman Khan Slams Sumbul Touqeer Saying She Is Obsessed With Shalin Bhanot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.