Bigg Boss 16 : अरेरे! साजिद खानची झाली वाईट अवस्था, डस्टबिनमधलं बटर खाण्याची दिली ऑफर...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:47 AM2022-10-10T10:47:21+5:302022-10-10T10:48:11+5:30
Bigg Boss 16 : बिग बॉसचा 16 वा सीझन सुरू होऊन आठवडा झाला आहे आणि आत्तापासून बिग बॉसच्या घरातल्यांची रोजच्या खाण्याची मारामार सुरू झाली आहे. साजिद खान याचंच उदाहरण घ्या...
‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16 ) स्पर्धकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. लक्झरी लाईफ सोडून मर्यादीत गोष्टींवर दिवस काढावे लागतात. अनेकदा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना पोटभर जेवणही मिळत नाही. राशनिंगमुळे त्यांना कमी खावं लागतं. आता हेच बघा ना! बिग बॉसचा 16 वा सीझन सुरू होऊन आठवडा झाला आहे आणि आत्तापासून बिग बॉसच्या घरातल्यांची खाण्यासाठी तगमग सुरू झाली आहे. साजिद खान (Sajid Khan) याचंच उदाहरण घ्या. गेल्या एपिसोडमध्ये साजिद खानने असं काही बोलताना दिसला की, सगळेच हैराण झालेत.
कचरापेटीत फेकलेलं बटर खाण्यासाठी वापरा, असं म्हणताना तो दिसला. साजिदची ही गोष्ट ऐकून घरातले सगळेच शॉक्ड झालेत. किचन एरियात गौतम विग, शालीद व साजिद आपआपसात चर्चा करत होते. गौतमला बटर हवं होतं. यादरम्यान साजिद डस्टबिनमध्ये फेकलेल्या सर्व बॉक्सेसमधील आपला बॉक्स शोधू लगतो. माझ्या बॉक्समध्ये बटरचं पॅकेट होतं. ते तू घेऊ शकतोस, असं तो गौतमला म्हणतो. साजिदची ही गोष्ट ऐकून शालीन भनोट हैराण होतो. तू कचºयातून डबा उचलणार? असं तो साजिदला म्हणतो. यावर साजिद हसू लागतो. वेळच तशी आलीये मित्रा, असं तो हसत हसत म्हणतो. यावर तू हे काय करतोय? असं शालीन म्हणतो. डस्टबिनमधलं बटर साजिद घेतो की नाही, हे दाखवलं गेलं नाही. कारण त्याचदरम्यान कॅप्टन निम्रत कौर घरवाल्यांवर ओरडताना दिसते आणि तिला ओरडताना पाहून सर्व गप्प बसतात.
साजिद खान बिग बॉसच्या घरात अगदी न्यूट्रल होऊन खेळताना दिसतोय. जणू बिग बॉसच्या घरात तो पिकनिक साजरी करायला आलाये, अशाप्रकारे तो खेळतोय. बिग बॉस हाऊसच्या बाहेर साजिदवरून नवा वादही सुरू झाला आहे. अनेकांनी साजिदच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.