बाबो! सलमान खाननं ‘Bigg Boss 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:26 AM2022-07-14T10:26:33+5:302022-07-14T10:27:41+5:30

Bigg Boss 16 , Salman Khan : ‘बिग बॉस 16’चा होस्ट सलमान असेल हे आता नक्की झालं आहे. चाहते खूश आहेत. पण त्यानं मागितलेली रक्कम वाचून बसेल धक्का

Bigg Boss 16 Salman Khan Asks For The Massive Hike In Fees |  बाबो! सलमान खाननं ‘Bigg Boss 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!!

 बाबो! सलमान खाननं ‘Bigg Boss 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!!

googlenewsNext

छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यंदाचं सीझन कोण होस्ट करणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. तर हा सीझनही सलमान खान (Salman Khan) हाच होस्ट करणार आहे. पण खरी बातमी पुढे आहे. होय, हा सीझन होस्ट करण्यासाठी सलमानने किती फी मागितली आहे माहितीये? त्याच्या फीचा आकडा वाचून तुमचे सुद्धा डोळे पांढरे होतील.

एका रिपोर्टनुसार, ‘दबंग खान’ने ‘बिग बॉस 16’साठी त्याच्या आधीच्या मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधन मागितलं आहे.  गेल्या अनेक सीझन्सपासून सलमान आपलं मानधन वाढवण्याची मागणी करत होता. पण कोरोना महामारीमुळे त्याला तडजोड करावी लागली होती. पण आता स्थिती आधीपेक्षा चांगली आहे आणि त्यामुळे सलमानने त्याची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने शो मेकर्सकडे त्याची फी तिप्पट वाढवण्याची मागणी केली आहे. सलमान खानने ‘बिग बॉस 15’साठी 350 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार, हिशोब केला तर ‘बिग बॉस 16’साठी त्याने 1050 कोटींची डिमांड केली आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण सलमान खान खरा ‘बिग बॉस’ आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक हा शो बघतात,हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे सलमानची डिमांड पूर्ण झालीच तर तो टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक महागडा होस्ट ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 16’च्या संभाव्य स्पर्धकांचा शोध सुरू आहे. मेकर्सनी अनेक सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. सलमान खान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या शोचा प्रोमो शूट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘बिग बॉस 16’ हा शोची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.  

Web Title: Bigg Boss 16 Salman Khan Asks For The Massive Hike In Fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.