'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन प्रेक्षकांनी ठरवला, मराठमोळ्या शिव ठाकरेची वर्णी लागताच अर्चनाला झोंबली मिरची!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:10 PM2022-12-28T18:10:20+5:302022-12-28T18:11:58+5:30

बिग बॉस-१६ मध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्यासाठी कॅप्टनची निवड केली जाते आणि यासाठी कॅप्टन्सी टास्कही घेतलं जातं.

Bigg Boss 16 shiv thakare elected as new captain the audience decided the new captain | 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन प्रेक्षकांनी ठरवला, मराठमोळ्या शिव ठाकरेची वर्णी लागताच अर्चनाला झोंबली मिरची!

'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन प्रेक्षकांनी ठरवला, मराठमोळ्या शिव ठाकरेची वर्णी लागताच अर्चनाला झोंबली मिरची!

googlenewsNext

बिग बॉस-१६ मध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्यासाठी कॅप्टनची निवड केली जाते आणि यासाठी कॅप्टन्सी टास्कही घेतलं जातं. पण हिंदी बिग बॉसमध्ये यावेळी थेट प्रेक्षकच घरात पोहोचले आणि त्यांनी नव्या कॅप्टनची निवड केली आहे. बिग बॉसमध्ये प्रेक्षकांनी कॅप्टन निवडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यावेळी प्रेक्षकांनी घरातील सदस्यांशी संवाद साधला. यात एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक यांना तीन वेगवेगळ्या फेऱ्यांसाठी फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं होतं. 

घरातील कॅप्टन वोटिंगच्या आधारावर ठरवला जाणार असल्याचं बिग बॉसनं जाहीर केलं. तिन्ही उमेदवारांसाठी काही टास्क देण्यात आले. यातील एका फेरीत उमेदवारांना एकमेकांवर टीका करायी होती आणि आपण इतर दोन उमेदवारांपेक्षा कसे उत्तम आहोत हे पटवून द्यायचं होतं. या टास्कमध्ये तिघांनीही एकमेकांबद्दल कोणतीही वाईट गोष्ट सांगितली नाही. 

जेव्हा बिग बॉसनं टास्क कोण जिंकेल असं अर्चना गौतम हिला विचारलं तेव्हा तिनं एमसी स्टॅन आणि अब्दू याचं नाव घेतलं. शिव ठाकरेला तिनं टाळलं. निकाल जाहीर झाला आणि शिव ठाकरे नवा कॅप्टन असणार असल्याचं निश्चित झालं. निकार ऐकताच अर्चना गौतम हिला धक्काच बसला. शिव कसा जिंकला असा प्रश्न तिला पडला. त्यानंतर साजिद खान यांनी शिव हा सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करतो, त्यामुळे लोकांना तो आवडतो असं अर्चनाला सांगितलं.

Web Title: Bigg Boss 16 shiv thakare elected as new captain the audience decided the new captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.