Bigg Boss 16 : BB हाऊसमध्ये अर्ध्यारात्री रोमान्स, नॅशनल टीव्हीवर श्रीजिता व सौंदर्याचा लिपलॉक; अब्दु-शिव शॉक्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:05 AM2022-12-29T11:05:46+5:302022-12-29T11:06:32+5:30
Bigg Boss 16 , Soundarya Sreejita lip-lock Kiss: ‘बिग बॉस 16’मध्ये आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं असं काही घडलं. बिग बॉसच्या घरात असा काही रोमान्स पाहायला मिळाला की पाहणाऱ्यांनाही मोठा धक्का बसला...
‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16 ) आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं असं काही घडलं. बिग बॉसच्या घरात असा काही रोमान्स पाहायला मिळाला की पाहणाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. होय, रात्री बिग बॉसच्या घरातील दिवे विझले आणि रात्रीच्या अंधारात दोन सदस्य लिपलॉक करताना दिसले. आता हे दोघं टीना दत्ता व शालीन भनोट असतील असा अंदाज तुम्ही बांधाल. पण नाही... रात्रीच्या अंधारात लिपलॉक करणारे टीना व शालीन नसून श्रीजिता डे ( Sreejita De) व सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) या दोघी होत्या. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. काल रात्री बिग बॉसच्या घरात श्रीजिता व सौंदर्या शर्माचा रोमान्स पाहायला मिळाला आणि या स्कँडल लिपलॉकचे साक्षीदार बनले शिव ठाकरे व अब्दु रोझिक. दोघांच्या समोर हा रोमान्स सुरू होता. कदाचित अब्दुने याची कल्पनाही केली नव्हती. तो तर हे सगळं पाहून हैराण झाला.
These two girls are doing cheap tactics with Abdu but Our #AbduRozik𓃵 is very chalak bro.
— 𝓐𝓫𝓭𝓾 𝓡𝓸𝔃𝓲𝓴 𝓕𝓪𝓶𝓲𝓵𝔂 (@AbduRozikFamily) December 28, 2022
Watch entire video 😂 how #ShiBdu destroyed their cheapness.
Today's Episode Day 88#BiggBoss16#BB16#ShivThakarepic.twitter.com/u3QCihWjPe
सध्या सोशल मीडियावर याच रोमान्सची चर्चा सुरू आहे. बीबी लव्हर्स या रोमान्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी श्रीजिता व सौंदर्या दोघींना ट्रोलही केलं आहे.
नेमकं काय झालं?
तर रात्री बीबी हाऊसमधील दिवे विझले होते. शिव ठाकरे, अब्दु रोझिक, श्रीजिता डे व सौंदर्या शर्मा चौघेही मात्र मस्ती करण्यात दंग होते. सौंदर्या व श्रीजिता यांचं दोन दिवसानंतर पॅचअप झालं होतं. त्यामुळे दोघीही जाम खूश होत्या. चौघांचीही मस्ती सुरू होती. किसवर चर्चा सुरू होती. अशात अचानक सौंदर्या व श्रीजिता दोघी लिपलॉक करताना दिसल्या. हे पाहून शिव व अब्दु दोघंही शॉक्ड झालेत. हे इथेच थांबलं नाही. सौंदर्यासोबत लिपलॉकनंतर श्रीजिताने अब्दु व शिव या दोघांना लिपलॉक करायला सांगितलं. यावर पागल है क्या? असं अब्दु म्हणाला. मी पहिल्यांदा दोन मुलींना लिपलॉक करताना पाहिलं, असंही अब्दु म्हणाला. यावर, आम्हाला जज करू नकोस, असं श्रीजिता म्हणाली आणि यानंतर तिने चक्क अब्दुच्या गालावर किस केलं. दुसरीकडे सौंदर्या शिवसोबत फ्लर्ट करू लागली. तिनेही शिवच्या गालावर किस केलं.
सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे. अनेकांनी यावरून श्रीजिता व सौंदर्याची मजा घेतली आहे. काहींनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. याआधी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये नेहा भसीनने रिद्धिमा पंडिला लिप किस केला होता. नॅशनल टीव्हीवर हे पाहून लोक शॉक्ड झाले होते.