'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅननं नाकारली 'खतरों के खिलाडी'ची ऑफर, मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 18:28 IST2023-04-06T18:28:08+5:302023-04-06T18:28:37+5:30
MC Stan : ‘खतरों के खिलाडी’चा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे आणि यंदाच्या १३व्या सीझनमध्ये रॅपर एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅननं नाकारली 'खतरों के खिलाडी'ची ऑफर, मोठं कारण आलं समोर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi). गेली अनेक वर्ष या शोमधील चित्तथरारक स्टंट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. आता लवकरच १३ वा सीझन सुरू होणार आहे आणि यंदाच्या १३व्या सीझनमध्ये रॅपर एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅन(MC Stan)ने या शोला नकार दिल्याचे समोर आले आहे.
रोहित शेट्टीच्या स्टंट आणि अॅडव्हेंचरवर आधारित शो खतरों के खिलाडीमध्ये स्पर्धकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि शेवटी हे सर्व स्टंट उत्तमरीत्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला विजेतेपदाची ट्रॉफी दिली जाते. या कार्यक्रमाच्या १३व्या सीझनसाठी या शोच्या निर्मात्यांनी एमसी स्टॅनला विचारले होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमसी स्टॅनने या शोला स्पष्टपणे नकार दिला आहे. निर्माते स्टॅनला या कार्यक्रमाचा स्पर्धक बनवण्यासाठी मोठ्या मानधनाची ऑफर देत होते. मात्र तरीही स्टॅनने त्यांची ही ऑफर नाकारली. त्याला सध्या त्याच्या नव्या गाण्यांवर काम करायचे असल्यामुळे स्टॅनने या शोमध्ये सहभागी व्हायला नकार दिला आहे.
खतरों के खिलाडी १३ हा शो कलर्स टीव्हीवर १७ जुलै पासून प्रसारित होईल असे सांगितले जात आहे. पण अद्याप चॅनेलने किंवा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी कोणत्याही तारखेची अधिकृत घोषणा केली नाही. याचबरोबर या सीझनचे शूटिंग केपटाऊनऐवजी अर्जेंटिनामध्ये होणार आहे. या आधीचा खतरों के खिलाडीचा ७वा आणि ९वा सीझन अर्जेंटिनामध्ये शूट करण्यात आला होता.