चाहते हैराण, 'बिग बॉस 17′ मधून 'हा' स्पर्धक बेघर, अचानक झालं मिड वीक एव्हिक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:19 IST2024-01-05T14:13:38+5:302024-01-05T14:19:23+5:30
'बिग बॉस 17' मधून आता एक मोठे अपडेट समोर आले आहे.

चाहते हैराण, 'बिग बॉस 17′ मधून 'हा' स्पर्धक बेघर, अचानक झालं मिड वीक एव्हिक्शन
'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या पर्वात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'बिग बॉस 17'मधील अभिषेक कुमारचा प्रवास संपला आहे. कमी वोट मिळाल्यामुळे नव्हे तर अंकिता लोंखडेने अभिषेक कुमार या कार्यक्रमातून काढले. 'बिग बॉस 17' मधून मिळालेल्या अधिकाराचा वापर अंकिताने केला.
Breaking #BiggBoss17#AbhishekKumar has been ELIMINATED from the House
— The Khabri (@TheKhabriTweets) January 4, 2024
गेल्या एपिसोडमध्ये समर्थ जुरेल आणि अभिषेक यांच्यात भांडण झालं होतं. वाद इतका वाढला की दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांचे भांडण पाहून घरातील सर्व सदस्य हादरून गेले. मात्र, यानंतर अभिषेकने चूक लक्षात येताच बिग बॉसची माफी मागितली. मात्र, अंकिताने अभिषेकला बाहेरचा रस्ता दाखवला. अंकिता घराची कॅप्टन असल्याने निर्णय घेण्याची जबाबदारी बिग बॉसने अंकितावर सोपवली. अभिषेकला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय अंकिता घेते. 'खबरी या फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे.
'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेले स्पर्धक मारामारी करू शकत नाही. 'बिग बॉसच्या 17' वा सिझन फायनलकडे वळत आहे, तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ओरी, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.