लेकीवर हात उचलल्यानंतरही अंकिताच्या आईने घेतली विकीची बाजू; म्हणाल्या, 'तो एकदम प्रेमळ..'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:09 PM2023-12-28T12:09:08+5:302023-12-28T12:09:54+5:30
Ankita lokhande: अलिकडेच बिग बॉसच्या घरात विकीने रागाच्या भरात अंकितावर हात उचलला.
अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी बिग बॉस 17 (bigg boss 17) मध्ये सहभागी झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी त्यांचे एकमेकांसोबतचे वाद विकोपाला जातात. तर, कधी त्यांच्यातलं प्रेम बहरुन येतं. यामध्येच सध्या बिग बॉसच्या घरातला या जोडीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात विकी रागाच्या भरात अंकितावर हात उचलायचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया दिली आहे. यात तिच्या आईचं वक्तव्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी आईला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
विकी जैन अंकिताला मारण्यासाठी धावल्यानंतर त्याच्या आईने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यात त्यांनी विकीची बाजू सावरली असून त्याने जे केलं ते योग्य होतं असं म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
नेमकं काय म्हणाली अंकिताची आई?
काय म्हणाली अंकिताची आई?
"जे दिसतंय ते एकदम चुकीचं होतं. मी विकीला ओळखते. त्याच्यासोबत राहिले आहे मी. त्यामुळे त्याला चांगलं ओळखते. हे खूप चुकीचं आहे. तो खूप प्रेमळ आहे. आणि ते दोघंही प्रेमाने एकत्र राहतात", असं अंकिताच्या आईने म्हटलं. त्यांचं हे वाक्य ऐकून नेटकरी भलतेच संतापले आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
'आता खोटं बोलावंच लागेल ना, पण सत्य काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहितीये', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'कटू सत्याचा स्वीकार करा काकू', 'आता जावयाला पाठिशी घालू नका', 'मुलीचा संसार वाचावा यासाठी त्या असं करतायेत', असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.