अंकिताने लिप KISS करण्याचा प्रयत्न करताच चिडला विकी, पत्नीला झिडकारलं, म्हणतो - "टेलिव्हिजनवर असलं... "
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:45 PM2024-01-17T13:45:42+5:302024-01-17T13:46:10+5:30
बिग बॉस १७ (Bigg Boss 17)च्या घरात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर दोघेही भांडत असतात. आता त्या दोघांमध्ये किसवरून भांडणे सुरू झाली आहेत.
बिग बॉस १७ (Bigg Boss 17)च्या घरात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर दोघेही भांडत असतात. आता प्रकरण अशा टप्प्यावर पोहोचले आहे की दोघांमध्ये किसवरून भांडणे सुरू झाली आहेत. अंकिताने त्याची किस घेतल्यावर विकीला राग आला. तो अंकितावर खूप वैतागला आणि तिला खडेबोल लगावले आहेत.
अंकिता विक्कीसोबत रोमँटिक होण्याचा प्रयत्न करते असे या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते. ती तयार होते आणि विकीला विचारते मी कशी दिसत आहे. यानंतर ती विकीच्या जवळ गेली आणि त्याला किस केली. यावर विकी तिला म्हणाला की हे सर्व करू नकोस. तुला का समजत नाही? प्लीज गोष्टी समजून घे. चांगले वाटत नाही. रागावू नको, पण समजून घे. स्माइल कर. यावर अंकिता म्हणते की नाही. जर मी माझ्या नवऱ्याची किस घेऊ नको तर मी कोणाची किस घेऊ? तू करत नाही तर मला करू दे.
विकी अंकितावर चांगलाच चिडला
यावर विकी म्हणतो की फक्त एकच इमोशन नसते. असे होत नाही की तुम्ही दिवसभरात २६ चेहरे करा आणि नंतर एक किस द्या. असे घडत नाही. यावर अंकिता म्हणते की, निदान मी तरी करते. मग अंकिता उठून निघून गेली. मग जेव्हा विकी उठून अंकिताकडे जातो तेव्हा अंकिता त्याला म्हणते, दुरून बोल. मी फक्त किस घेतली. मी मागतेय असे वाटते. हे फक्त माझे प्रेमळ जेस्चर होते. मग विकी म्हणतो की एकदा गालावर किस झाली होती, मला टीव्हीवर ओठांवर किस घेतलेली आवडत नाही. तर अंकिता म्हणते की मी ओठांवर किस करत नव्हते, दुसऱ्या गालावर करत होते. यानंतर विकी अंकितावर चिडून तिथून निघून गेला.