"पिक्चर अभी बाकी" म्हणतं आयशा खाननं पुन्हा केलं मुनव्वर फारुकीला टार्गेट, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:27 AM2024-01-22T10:27:58+5:302024-01-22T10:31:24+5:30

बिग बॉस 17'मधून बाहेर पडताच आयशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  मुनव्वर फारुकीला टार्गेट केलं. 

Bigg boss 17 ayesha khan first post after eviction salman khan show Bigg Boss 17 targets Munawar Farooqui, says Picture Abhi Baqi | "पिक्चर अभी बाकी" म्हणतं आयशा खाननं पुन्हा केलं मुनव्वर फारुकीला टार्गेट, शेअर केली पोस्ट

"पिक्चर अभी बाकी" म्हणतं आयशा खाननं पुन्हा केलं मुनव्वर फारुकीला टार्गेट

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कायम चर्चेत असतो.  आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नुकतंच आयशा खान आणि ईशा मालवीय घरातून बाहेर पडले आहेत.  'बिग बॉस 17'मधून बाहेर पडताच आयशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  मुनव्वर फारुकीला टार्गेट केलं. 

आयशा खानने पहिली पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलं, 'हा एक कठीण प्रवास होता, एक भावनिक रोलर कोस्टर होता, परंतु तुम्ही लोकांनी मला ज्या प्रकारे पाठिंबा दिला आणि प्रेम केलं ते पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. तुमच्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं. तुमच्या प्रेमाची मी कृतज्ञ आहे.तुमच्या हातात माझं आयुष्य आहे. मला फक्त प्रेम पाहिजे… आणि हो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'.  मुनव्वर फारुकीबद्दल आणखी काही खुलासा आयशा करणार आहे का, असा तर्क नेटकरी लावत आहेत. 

आयशा ही मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आहे. तिची 'बिग बॉस 17'च्या घरात  वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. घरात प्रवेश करताच आयेशाने मुनव्वरविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले. ज्यामुळे मुनव्वरचं एक प्रकारे पितळ उघड पडलं. मुनव्वर एकाच वेळी डबल डेटिंग करत असल्याचा आरोपही तिने त्याच्यावर केला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. 

 'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. आता काहीच दिवसात या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. जसे-जसे शेवटचे दिवस जवळ येत आहेत, तसे-तसे 'बिग बॉस 17'मधील स्पर्धकांची संख्या कमी होत आहे. आता बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. आता येत्या एपिसोडमध्ये  कोण घराबाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Web Title: Bigg boss 17 ayesha khan first post after eviction salman khan show Bigg Boss 17 targets Munawar Farooqui, says Picture Abhi Baqi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.