शार्क टँक इंडियामध्ये विकी जैनला व्हायचंय जज? चाहत्याने दिली कल्पना; पोस्ट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 02:17 PM2024-03-16T14:17:19+5:302024-03-16T14:17:49+5:30
विकी जैन फक्त अंकिताचा पती नसून यशस्वी बिझनेसमन आहे.
बिझनेसमन विकी जैनची (Vicky Jain) ओळख आता अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) पती म्हणून मर्यादित राहिलेली नाही. 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची स्वत:ची एक वेगळी ओळख बनली. बिग बॉसच्या घरात त्याला मास्टरमाईंड म्हणलं जायचं. प्रेक्षकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला. त्याचा खेळ, सेन्स ऑफ ह्युमर लोकांना आवडला होता. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने त्याला शार्क टँक शोमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावर विकी काय म्हणाला बघा.
विकीने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एकाने लिहिलं, 'तुम्हाला शार्क टँकमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघायचं आहे. तुम्ही नक्कीच चांगलं कराल.' यावर विकीने चॅनलला टॅग करत लिहिले, ' बघा पुढच्या सिझनसाठी मागणी होत आहे. जनतेच्या मागणीवरुन तुम्ही परिक्षकाच्या भूमिकेसाठी माझआ विचार करु शकता.'
तर दुसरीकडे काही चाहत्यांनी त्याला फिल्म इंडस्ट्रीत येण्याची विनंती केली. त्यावर तो म्हणाला की तो आधीच एका प्रोजेक्टवर काम करत आहे आणि लवकरच त्याला स्क्रीनवर बघण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आणखी एका चाहत्याने त्याला बिझनेसविषयी सल्ला विचारला. त्यावर तो म्हणाला, 'सहनशीलता ठेव.खूप खोदल्यानंतरच कोळश्याचा हिरा होतो.
विकी जैन 'बिग बॉस 17' मध्ये फायनलिस्टचा उत्तम दावेदार होता. मात्र त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच एक म्हणजे त्याचं पत्नी अंकितासोबत बिघडत चाललेलं नातं. तरी शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांचं नातं सुधारलं. विकी लवकरच सिनेमा किंवा अन्य प्रोजेक्टमध्ये दिसू शकतो.