Bigg Boss 17 Finale: अंकिता अन् सासूबाईंनी एकमेकींना दिलं 'हे' वचन, सलमान खानने उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:25 PM2024-01-28T21:25:05+5:302024-01-28T21:39:21+5:30
अंकिताशी तिची सासू बाहेरुन संवाद साधते आणि दोघी एकमेकींना एक वचन देतात. तर हे पाहून सलमान मात्र दोघींची चांगलीच चेष्टा करतो.
Bigg Boss 17 Finale: बिग बॉस 17 फिनाले हसत्याखेळत्या माहोलमध्ये सुरु आहे. ज्याची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती तो होस्ट दबंग स्टार सलमान खानची एन्ट्री झाली आहे. स्टेजवर येताच सलमानने सर्वांचं आधी अभिनंदन केलं आहे. तर अंकिता आणि तिच्या सासूच्या संभाषणामुळे चांगलीच मजा आली आहे. अंकिताशी तिची सासू बाहेरुन संवाद साधते आणि दोघी एकमेकींना एक वचन देतात. तर हे पाहून सलमान मात्र दोघींची चांगलीच चेष्टा करतो. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अंकिताची सासू रंजना जैन आणि अंकिता यांच्यात मधल्या काळात नॅशनल टेलिव्हिजनवरच वाद झाला. अंकिताची सासू फॅमिली वीकमध्ये घरात आली असता तिने अंकिताला बोल लावले होते. तसंच विकी अंकिताला खूप सूट देतो असं त्या म्हणाल्या होत्या. सासू-सूनेतील वाद बराच चर्चेत होता. आज फिनालेमध्ये अंकिताची सासू सूनेला पाठिंबा देण्यासाठी आली आहे. यावेळी दोघांनी सलमान खानसमोर एकमेकींना वचनही दिलं आहे. अंकिता म्हणाली, 'मी वचन देते की बाहेर आल्यानंतर मी आणि विकी एकमेकांसोबत भांडणार नाही.' यावर सलमान म्हणतो, 'हे तर अशक्य आहे'. तर अंकिताची सासू अंकिताला वचन देते की,'घरी आल्यानंतर तुला आम्ही खूप प्रेम देऊ'. यावर सलमान खान म्हणतो,'हा प्रेमाने ठेवू, बाहेर येऊन दाखव.'
विकी जैन आणि अंकिता लोखंडे दोघांच्या आई नुकत्याच बिग बॉस फिनालेच्या सेटवर पोहोचल्या आहेत. यावेळी पापाराझींनी त्यांना सेटबाहेरच घेरलं आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. माध्यमांनी अंकिताची सासू रंजना जैन (Rajni Jain)यांना विचारलं की, 'काय वाटतं कोण जिंकणार? अंकिता विजेतेपदाच्या जवळ आली आहे. काय सांगाल?' यावर रंजना जैन म्हणतात, "अंकिता नक्कीच जिंकेल...ट्रॉफी घेऊन घरी येईल."