Bigg Boss : आधीच्या विजेत्यांने दिले १ कोटी, आता रक्कमेत घट, आतापर्यंत कुणाला मिळाली किती रक्कम ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 12:35 PM2024-01-28T12:35:49+5:302024-01-28T12:41:42+5:30
आज 'बिग बॉस 17' च्या विजेत्याची घोषणा होणार आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 17' शोची चर्चा रंगली आहे. कारण, आज 'बिग बॉस 17' च्या विजेत्याची घोषणा होणार आहे. विजेत्याला ट्रॉफीसह मोठी रक्कम मिळणार आहे. हा 'बिग बॉस'चा 17 वा सीझन आहे. याआधी 16 सीझन पार पडले आहेत. बिग बॉस सुरु झाले तेव्हा विजेत्याला देण्यात येणाऱ्या रक्कमेचा आकडा हा एक कोटी ऐवढा होता. मात्र, नंतर बक्षिसाची रक्कमेत बदल करण्यात आले. तर 1 ते सीझन 16 पर्यंत 'बिग बॉस'च्या ट्राफीवर नाव कोरणाऱ्या सर्व विजेत्यांना ट्रॉफीसह बक्षीस म्हणून काय मिळाले, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
'बिग बॉस'चा पहिला सीझन 2007 मध्ये राहुल रॉयने जिंकला होता. त्यावेळी राहुलला ट्रॉफीसह एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. तर 2008 मध्ये आशुतोष कौशिकने 'बिग बॉस'चा दुसरा सीझन जिंकला होता. त्यालाही एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच 2009 मध्ये विंदू दारा सिंगने तिसरा सीझन जिंकला. त्यालाही एक कोटी रुपये बक्षिसात मिळाले होते. सलमान खानने 2011 मध्ये पहिल्यांदा 'बिग बॉस' होस्ट करण्यास सुरुवात केली आणि श्वेता तिवारी हिने चौथा सीझन जिंकला. तिलाही 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. यानंतर 'बिग बॉस'चा 5 वा सीझन अभिनेत्री जुही परमार हिने जिंकला तिलाही 1 कोटी रुपये देण्यात आले होते.
पण, 2013 मध्ये बक्षिसाच्या रकमेत बदल करण्यात आला. या 'बिग बॉस'च्या सहाव्या सीझनची विजेता उर्वशी ढोलकिया आणि 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनची विजेता गौहर खान यांना ट्रॉफीसह 50 लाख रुपये मिळाले होते. यानंतर 2015 मध्ये 'बिग बॉस'चा सीझन 8 हा गौतम गुलाटीने जिंकला, ज्याला बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळाले. यानंतर प्रिन्स नरुलाने 'बिग बॉस'चा नववा सीझन जिंकला. त्यालाही 50 लाख रुपये मिळाले होते. तर 'बिग बॉस'चा दहावा सीझन हा मनवीर गुर्जरनं जिंकला होता. त्याला 50 लाख रुपये भेटले होते.
यानंतर 2018 मध्ये 'बिग बॉस'चा अकरावा सीझन शिल्पा शिंदेने जिंकला. शिल्पा शिंदेने हिना खानपेक्षा जास्त मते मिळवून 44 लाख रुपये जिंकले होते. तर बारावा सीझन हा प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करने जिंकला. तिला 30 लाख रुपये ऐवढी रक्कम मिळाली होती. तर सर्वांत चर्चेत राहिलेला 2020 मधील 'बिग बॉस'चा तेरावा सीझन हा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जिंकला होता. त्याला ट्रॉफीसह 50 लाख रुपये मिळाले. 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. 'बिग बॉस'चा 14वा सीझन हा रुबिना दिलैकने जिंकला होता. तिला 36 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली होती. तर 15 वा सीझन हा तेजस्वीने जिंकला. ज्यामध्ये तिला'बिग बॉस'च्या ट्रॉफीसह 40 लाख रुपये मिळाले होते.
पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा 'बिग बॉस'च्या 16 व्या पर्वाचा विजेता ठरला. तर मराठमोळा शिव ठाकरेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. एमसी स्टॅनला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी, त्याबरोबरच 31 लाख 80 हजार ही रक्कम देण्यात आली. त्याबरोबरच त्याला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली. तर आता बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार आणि त्याला ट्रॉफीसह बक्षिसात काय मिळणार याबद्दल जोरदार चर्चा ही बघायला मिळतेय.