Bigg Boss 17: धमाकेदार पर्वाला होणार सुरुवात, फ्रीमध्ये पाहता येणार 'बिग बॉस १७', कधी आणि कुठे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 04:36 PM2023-10-15T16:36:01+5:302023-10-15T16:37:12+5:30

'बिग बॉस'च्या नव्या पर्वाचा आज ग्रँड प्रिमियर पार पडणार आहे. या पर्वाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

bigg boss 17 grand premeire where to watch salman khan show know in details | Bigg Boss 17: धमाकेदार पर्वाला होणार सुरुवात, फ्रीमध्ये पाहता येणार 'बिग बॉस १७', कधी आणि कुठे? वाचा

Bigg Boss 17: धमाकेदार पर्वाला होणार सुरुवात, फ्रीमध्ये पाहता येणार 'बिग बॉस १७', कधी आणि कुठे? वाचा

'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा रिएलिटी शो आहे. या शोचे घराघरात चाहते आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून 'बिग बॉस १७'ची चर्चा सुरू आहे. यंदाच्या या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या नव्या पर्वाला आजपासून(१५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. 

'बिग बॉस'चं १६वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत होतं. या पर्वात मराठमोळा शिव ठाकरे सहभागी झाला होता. तर छोट्या अब्दु रोझिकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

कुठे पाहता येणार? 

'बिग बॉस'च्या नव्या पर्वाचा आज ग्रँड प्रिमियर पार पडणार आहे. कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस १७'चा ग्रँड सोहळ्याला रात्री ९ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. कलर्सप्रमाणे बिग बॉस 'वूट' या ओटीटी अँपवर पाहता यायचं. पण, यंदा मात्र 'बिग बॉस' वूटवर दिसणार नाही. तर वूटऐवजी 'बिग बॉस १७' जिओ सिनेमावर टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना 'बिग बॉस १७' जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बिग बॉस १७' होस्ट करणार आहे. सिंगल विरुद्ध कपल अशी यंदाच्या 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची थीम असणार आहे. त्यामुळे या पर्वाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  सोमवार ते शुक्रवार 'बिग बॉस १७' रात्री १० वाजता तर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रसारित केलं जाणार आहे. 
 

Web Title: bigg boss 17 grand premeire where to watch salman khan show know in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.