Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:54 IST2023-11-29T15:54:51+5:302023-11-29T15:54:51+5:30
बिग बॉसचं १७ चं पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे.

Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली...
बिग बॉसचं १७ चं पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. अंकिता लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अंकिता खरंच प्रेग्नेंट आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. या आठवड्यात जिग्ना व्होरा शोमधून आऊट झाल्यानंतर तिने अंकिताच्या प्रेग्नेंसीबाबतचा खुलासा केला आहे.
शोमधून बाहेर पडल्यानंतर जिग्ना व्होरा अनेक मुलाखत देत आहे. फिल्मीबीटने जिग्नाला अंकिता प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न विचारला. यावर ती म्हणाला, “रिंकूजी आणि मी हे खूप गांभीर्याने घेतले असते. प्रेग्नेंट असलेल्या प्रत्येकीला आबंट खावसं वाटतं असे काही गरजेचे नाही. हे फक्त हिंदी सिनेमात होतं.
जिग्नाने सांगितले की, शोमध्ये येण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची ब्लड टेस्ट झाली होती. ती गरोदर असती तर आधीच कळले असते. जिग्ना म्हणते की, आता तिला वाटते की अंकिताने प्रसिद्धीझोतात येण्यासाठी गरोदरपणाबद्दल बोलतेय.
जिग्ना म्हणाली की, अंकिता आणि विकीची भांडण पाहिल्यानंतर तिला आनंद झाला की ती शोमध्ये एकटीच गेली होती. जिग्ना म्हणाली, “सुरुवातीला मला वाटले की तिच्याकडे भावनिक आधार आहे. पण नंतर तिला पाहून मी एकटीच घरात गेल्याचा आनंद झाला. त्यांना अनेक प्रकारच्या समस्या आहेत. एक कपल म्हणून राहणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.”
जिग्ना म्हणाली की, विकी घरातील सगळ्यांना गेम कसा खेळायचा हे समजावून सांगतो, पण अंकिताकडे लक्ष देत नाही. त्याने अंकितासोबत वेळ घालवायला हवा असे अनेकवेळा विकीला सांगितले आहे, पण तो पूर्णपणे त्याच्या खेळात उतरला आहे.