"अंकिता बिग बॉस जिंकली पाहिजे, पण लग्नाच्या...", कंगनाची मराठी अभिनेत्रीसाठी पोस्ट, म्हणते-तिची सासू...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:40 AM2024-01-10T11:40:25+5:302024-01-10T11:41:06+5:30
Bigg Boss 17 : कंगनाने विकी जैनच्या आईचा एक व्हिडिओ शेअर करत अंकिताला पाठिंबा दिला आहे.
'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झालेली अंकिता लोखंडे तिच्या वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. अंकिता आणि विकीमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन बिग बॉसच्या घरात वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे विकी आणि अंकिताच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. नुकतंच 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांच्या कुटुंबीयांना घरात बोलविण्यात आलं आहे. विकी जैन आणि अंकिताची आई 'बिग बॉस'च्या घरात हजेरी लावली होती. बिग बॉसच्या घरातील अंकिता आणि तिच्या सासूचा व्हिडिओ समोर आला होता.
यामध्ये अंकिता आणि विकी जैनच्या आईमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे अंकिताच्या सासूला ट्रोल करण्यात आलं होतं. आता याबाबत कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने अंकिताला पाठिंबा दिला आहे. कंगनाने विकी जैनच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या म्हणतात, "अंकिता या इंडस्ट्रीमध्ये १७ वर्षांपासून काम करत आहे. आपल्यापेक्षा छोट्या लोकांना तिने जिंकू दिलं तर काय फरक पडतो? यामुळे तिचा खेळ खराब होत आहे. समर्थसारख्या लोकांचं व्यक्तिमत्व नाही आणि चरित्रही नाही."
कंगनाने इन्स्टास्टोरीमध्ये अंकिताची आई आणि सासूला पाठिंबा दिला आहे. ती म्हणते, "मीडिया तुमच्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अंकिताची सासू तिला कशी मदत करते, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. रिएलिटी शो येतील आणि जातील...पण, कुटुंब कायम सोबत असतं. मला वाटतं अंकिताने हा शो जिंकावा. पण, यासाठी तिला तिच्या वैवाहिक आयुष्याची किंमत मोजावी लागू नये."
अंकिताला 'पवित्रा रिश्ता'मधून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातही अंकिता झळकली होती. दरम्यान, अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरे आहेत. पहिल्यादिवसपासूनच विकीने बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. अनेकदा घरात विकी आणि अंकिताची भांडणं पाहायला मिळाली. काही कारणांमुळे त्यांचा वाद घटस्फोटापर्यंतही गेला होता.