आयशाने केला मुनव्वर फारुकीवर नवा आरोप; '२ महिने मी सतत त्याच्यासोबत होते, पण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:21 PM2023-12-25T12:21:11+5:302023-12-25T12:22:04+5:30
Ayesha khan: आयशाने मुनव्वर फारुकीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' (bigg boss 17) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. यापूर्वी हा शो अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीमुळे चर्चेत येत होता. परंतु, आता यात एका नव्या जोडीची चर्चा रंगली आहे. मुनव्वर फारुकी आणि त्याची गर्लफ्रेंड आयशा खान ही जोडी सध्या त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आली आहे.
अलिकडेच बिग बॉस 17 मध्ये आयशा खानची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. या घरात प्रवेश करताच आयेशाने मुनव्वरविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले. ज्यामुळे मुनव्वरचं एक प्रकारे पितळ उघड पडलं आहे. मुनव्वर एकाच वेळी डबल डेटिंग करत असल्याचा आरोपही तिने त्याच्यावर केला होता. त्यानंतर आता तिने आणखी एक नवा आरोप त्याच्यावर केला आहे.
बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी मी माझ्या मुलासोबत २ महिने राहिलो होतो. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांसोबत छान वेळ घालवला, असं मुन्नवरने बिग बॉसच्या सदस्यांना सांगितलं होतं. परंतु, मुनव्वरने केलेला हा दावा खोटा असल्याचं आयशाने म्हटलं आहे. आयशाने इशा मालवीया आणि अंकिता लोखंडे, समर्थ जुरैल यांना मुनव्वर खोट बोलत असल्याचं सांगितलं.
नेमकं काय म्हणाली आयशा?
"मी जेव्हा केव्हा टीव्हीवर मुनव्वर काय बोलतोय हे ऐकायचे तर माझं असं व्हायचं की, किती खोटं बोलतोय हा माणूस. तो त्याच्या मुलासोबत ६ महिन्यांपासून असं त्याने सांगितलं. पण, मागच्या २ महिन्यांपासून तर मी त्याच्यासोबत होते. त्याचा मुलगा त्याच्यासोबत रहातच नव्हता. हे त्याने फक्त त्याच्या गेमसाठी केलंय", असं आयशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मुलींशी खोट बोलायचं आणि त्यांना फसवायचं ही त्याची सवयच आहे. फसवणूक करणं हा त्याचा पॅटर्न झालाय. पण, त्याच्या सगळ्या खोट बोलण्याचा माझाकडे पुरावा आहे."