Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:48 PM2023-10-17T13:48:44+5:302023-10-17T13:49:25+5:30
अंकिताचा नवरा विकी जैनमुळे मनाराला अश्रू अनावर झाले. पण, नेमकं काय झालं ज्यामुळे मनारा कॅमेऱ्यासमोरच रडू लागली?
'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. यंदा 'बिग बॉस'चं एक घर नसून तीन घरे आहेत. दिल, दिमाग आणि दम अशा तीन घरांमध्ये 'बिग बॉस'च्या घराची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने रंगतदार असणार आहे. 'बिग बॉस १७'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. तर प्रियांका चोप्राची बहीण मनारा चोप्रानेही बिग बॉसच्या घरात मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली.
पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. आता 'बिग बॉस'च्या घरातील एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मनारा चोप्रा रडताना दिसत आहे. अंकिताचा नवरा विकी जैनमुळे मनाराला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पण, नेमकं काय झालं ज्यामुळे मनारा कॅमेऱ्यासमोरच रडू लागली?
'बिग बॉस'ने दिल या घरात राहणाऱ्या सदस्यांना "कास्टिंग करताना माझ्याकडून चूक झाली अशा एका व्यक्तीचं नाव सांगा" असा प्रश्न विचारला. यावर नील भट्ट, ईशा मालवीय, ऐश्वर्या शर्मा यांनी मनाराचं नाव घेतलं. त्यानंतर विकीनेही बिग बॉसला मनारा असं सांगितलं. विकीनेही आपलं नाव घेतल्यामुळे मनारा दु:खी झाली आणि ढसाढसा रडू लागली. कलर्सने शेअर केलेल्या या व्हिडिओत मनारा म्हणते, "मला विकीमुळे जास्त वाईट वाटत आहे."
मनाराला दिल या घरातील सदस्यांकडून नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पहिल्याच वीकेंएडला मनाराला 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घ्यावी लागणार का? हे पाहावं लागेल.