'बिग बॉस 17'च्या घरात रंगले नॉमिनेशन टास्क, कोण होणार घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 02:21 PM2023-12-04T14:21:05+5:302023-12-04T14:24:26+5:30

नुकतेच बिग बॉसच्या घरात नॉमिनेश पार पडले असून लोकप्रिय स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss 17 Nomination Coffee Task Week 8 | 'बिग बॉस 17'च्या घरात रंगले नॉमिनेशन टास्क, कोण होणार घराबाहेर?

'बिग बॉस 17'च्या घरात रंगले नॉमिनेशन टास्क, कोण होणार घराबाहेर?

बिग बॉस’चं 17 वं पर्व दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. निर्माते टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत. नुकतेच बिग बॉसच्या घरात नॉमिनेश पार पडले. त्यामध्ये घरातील काही स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यात लोकप्रिय स्पर्धकांचा समावेश आहे. आता कोणता स्पर्धक घरातून बाहेर पडणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

‘कलर्स टीव्ही’च्या इन्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये  नॉमिनेशन टास्क सुरू असल्याचे दिसत आहे.  बिग बॉस 17 शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या फॅन पेजने नॉमिनेशनचे अपडेट दिले आहेत. यावेळी बिग बॉसमध्ये 8 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये नील भट्ट, मुन्रावर फारुकी, अनुराग डोवाल, विकी जैन, खानजादी, अभिषेक कुमार, सना रईस खान, अरुण महाशेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे.

 'बिग बॉस 17' मधील सर्वात मजबूत खेळाडू म्हणून दोन सेलिब्रिटी आघाडीवर आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे आणि मुन्नवर फारुकी या दोघांचा समावेश आहे. यापूर्वीच्या अंकिता नॉमिनेट झाली होती. मात्र, मुन्नवर कुणाच्याही गळाला लागला नव्हता. अखेर आता मुन्रावरही नॉमिनेट झाला आहे. 

आतापर्यंत 'बिग बॉस 17'च्या घरातून आतापर्यंत 5 स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. सोनिया बन्सल ही सगळ्यात आधी घराबाहेर पडली होती. तिच्यानंतर वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मनस्वी ममगाईला घरातून बेदखल करण्यात आले. तर तिसर्‍या क्रमांकावर नावेद सोल आहे, ज्याला मिडनाईट इव्हिक्शनमध्ये बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले होते. तर गेल्या आठवड्यात अभिषेकसोबत झालेल्या भांडणामुळे तहलका उर्फ सनी आर्याला शोमधून हाकलून लावले होते. 

Web Title: Bigg Boss 17 Nomination Coffee Task Week 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.