Bigg Boss 17: 'विक्की कीड़ा है कीड़ा...ऐसे निकाल के फेंक दूंगी',नवऱ्याला कंटाळली अंकिता लोखंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:14 PM2023-11-01T17:14:53+5:302023-11-01T17:15:09+5:30
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात बरीच भांडणे होत आहेत. लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिताने मुनव्वरला विक्कीबद्दल जे आवडत नाही ते सांगितले.
बिग बॉसचा १७वा सीझनही चर्चेत आहे. सलमान खानच्या या सर्वात वादग्रस्त शोमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार मारामारी पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे सेलिब्रिटी कपल देखील शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहेत. शोच्या पहिल्या एपिसोडपासून दोघेही खूप प्रसिद्धी मिळवत आहेत. विकी जैन बिग बॉसचा सीझन १७ चा मास्टरमाइंड बनत असताना, शोमध्ये त्याची पत्नी अंकितासोबतची त्याची सततची भांडणे देखील खूप चर्चेत आहेत. विकीसोबत भांडण झाल्यावर अंकिता अनेकदा रडताना दिसली आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये, पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता सह-स्पर्धक मुनव्वर फारुकीला सांगते की तिला विकी जैनची कोणती सवय आवडत नाही.
लेटेस्ट एपिसोडमध्ये, जेव्हा अंकिता मुनावर फारुकीसोबत बागेत फिरत होती. यादरम्यान अंकिता लोखंडे आणि मुनव्वर यांच्या लक्षात आले की विकी जैन रिंकू धवनशी बोलण्यात व्यस्त आहे. यावर, विकीकडे बघत अंकिता म्हणते, "किडा आहे विकी, किडा, त्या उवा असतात ना त्या झाल्या की खूप त्रास देतात. कधी कधी मलाही तो खूप त्रास देतो. मी त्याला असेच बाहेर काढून फेकून देईन."
विकीचा आवाज सहन होत नाही
अंकिता पुढे म्हणते, "त्याला काही विषय सापडतो, तो इतकं बोलू शकतो. बापरे, विकी आणि माझं घरात कधी भांडण झालं, तर असं वाटतं देवा नको होऊ देत. मला विकीचा आवाज सहन होत नाही. त्यावेळी विकी इतकं समजावतो की मला असं वाटतं की बस्स आता त्याने हे ज्ञान थांबवायला हवं. मी कधी कधी थकून जाते."
विकी आणि अंकिता यांच्यात अनेक भांडण झालीत
बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता यांच्यात अनेक भांडण झाली आहेत. विकी नेहमी अंकितावर ओरडताना दिसतो. नॅशनल टीव्हीवरही विकीने अंकिताला फटकारले आणि म्हणाला, “हे खूप वाईट आहे. तू मला आयुष्यात काहीच दिले नाहीस, प्लीज मला मन:शांती दे, मला लाज वाटते, ही तुझी सर्वात वाईट बाजू आहे जी मी कधीच पाहिली नाही.” तर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी विकीने अंकिताला ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे त्यावर टीका केली आहे.