'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:07 IST2024-02-11T13:06:56+5:302024-02-11T13:07:17+5:30
मुनव्वर आणि क्रिकेटर शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल
छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. नुकतंच 'बिग बॉस'चं १७वं पर्व पार पडलं. अनेक कारणांमुळे 'बिग बॉस १७' चर्चेत होतं. कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरत विजेतेपद मिळवलं. 'बिग बॉस १७'चा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. सर्वाधिक चर्चेत असलेला 'बिग बॉस' हा रिएलिटी शो जिंकल्यानंतर मुनव्वर सध्या पार्टी करण्यात व्यस्त आहे.
मुनव्वरच्या पार्टीतले अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. नुकतंच 'बिग बॉस १७'च्या स्पर्धकांबरोबर मुनव्वरने पार्टी केली. या पार्टीतील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. तर पार्टीतील मुनव्वरच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुनव्वर आणि क्रिकेटर शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये मुनव्वर आणि शुबमनसोबत निर्माता राघव शर्माही दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुनव्वरच्या पार्टीतील हा फोटो असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, 'बिग बॉस १७'चा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर फारुकीला ट्रॉफीबरोबरच ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते. त्याबरोबरच त्याला ह्युंडईची क्रेटा गाडीही मिळाली होती. 'बिग बॉस १७'चं विजेतेपद मिळवल्यानंतर मुनव्वरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.