Bigg Boss 17 : 'बिग बॉस'ची ट्रॉफी नावावर करणाऱ्याला मिळणार 'इतके' लाख रुपये, जाणून घ्या कधी आहे ग्रँड फिनाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:53 PM2024-01-18T16:53:12+5:302024-01-18T16:53:49+5:30

'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. आता काहीच दिवसात या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. 

bigg boss 17 winner will get trophy and prize money grand finale details inside | Bigg Boss 17 : 'बिग बॉस'ची ट्रॉफी नावावर करणाऱ्याला मिळणार 'इतके' लाख रुपये, जाणून घ्या कधी आहे ग्रँड फिनाले

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'ची ट्रॉफी नावावर करणाऱ्याला मिळणार 'इतके' लाख रुपये, जाणून घ्या कधी आहे ग्रँड फिनाले

टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच चवीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'.सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस हिंदी या रिएलिटी शोला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. झगमगत्या दुनियेतील चमचमते सितारे बिग बॉसच्या घरात एकत्र राहतात. 'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. आता काहीच दिवसात या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. 

'बिग बॉस १७'च्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. श्रीकांत माशेट्टी, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे सदस्य फिनाले वीकमध्ये पोहोचले आहेत. तर अंकिता लोखंडे, विकी जैन, आयशा खान आणि इशा मालवीय या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. या आठवड्यात डबल नॉमिनेशनमध्ये घरातील दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत. त्यानंतर 'बिग बॉस १७'च्या टॉप ६ सदस्यांमध्ये ट्रॉफीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अंकिता लोखंडे आणि मुन्नवर फारुकी हे दोघे बिग बॉसच्या ट्रॉफीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. २८ जानेवारीला या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 'बिग बॉस १७' च्या विजेत्याला ट्रॉफीबरोबरच लाखो रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. यंदाच्या पर्वाच्या विजेत्याला ३० ते ४० लाख रुपये मिळणार आहेत.  

Web Title: bigg boss 17 winner will get trophy and prize money grand finale details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.