Bigg Boss 18: विवियन डिसेनाला 'या' अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली, "चाहते तुला निराश करणार नाहीत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:05 IST2024-12-10T12:03:49+5:302024-12-10T12:05:13+5:30

अभिनेत्रीने विवियनच्या बायकोलाही टॅग करत लिहिले,...

Bigg boss 18 actress Rubina Dilaik supports Vivian Dsena says your fans wont let you down | Bigg Boss 18: विवियन डिसेनाला 'या' अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली, "चाहते तुला निराश करणार नाहीत..."

Bigg Boss 18: विवियन डिसेनाला 'या' अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली, "चाहते तुला निराश करणार नाहीत..."

'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) मधील सर्व सदस्यांमध्ये एक विवियन डिसेना (Vivian Dsena) लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अनेक जण त्याला बाहेरुन पाठिंबा देत आहे. विवियनची फॅन आर्मी मोठी आहे. मात्र घरात अविनाश मिश्राने व्हिव्हियनला नॉमिनेट करत सर्वांना धक्का दिला. तसंच विवियनला सर्वात जास्त लोकांनी नॉमिनेट केले आहे. यातच आता एका अभिनेत्रीने जी बिग बॉसची माजी विजेती आहे तिने विवियनला जाहीर पाठिंबा दिला आहे.

विवियन डिसेनाला नॉमिनेट केल्याने एकीकडे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) विवियनला पाठिंबा दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ तिने मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिले, "मी बिग बॉसच्या इतिहासात सर्वात टार्गेटेड आणि नॉमिनेटेड सदस्य होते. माझ्याकडे कधी कोणी पीआर नव्हता. ना कोणी माझ्यासाठी आवाज उठवला होता. याचा अर्थ हा एक कॅरेक्टर गेम आहे जो तुम्हाला वास्तव दाखवतो. बाहेरील प्रभावामुळे तुमच्या खेळावर याचा परिणाम झाला नाही पाहिजे."

ती पुढे विवियनच्या बायकोला टॅग करत लिहिते, "नूरान, मी तुझी स्थिती अगदीच समजू शकते. बायको या नात्याने तू नक्कीच डिस्टर्ब होत असशील पण तरी त्याच्यासाठी तू तुझं बेस्ट देत असशील. सगळ्यांनी ऐका त्याच्या नशिबात जे असेल ते होईलच. विवियन हा जनतेचा शो आहे आणि जनता जनार्दन आहे. तुझे चाहते कधीच तुला निराश करणार नाहीत."

बिग बॉसमध्ये या आठवड्यात विवियन डिसेनासह चाहत पांडे, करणवीर मेहरा, एडिन रोज, तजिंदर बग्गा, दिग्विजय राठी हे देखील नॉमिनेट झाले आहेत.

Web Title: Bigg boss 18 actress Rubina Dilaik supports Vivian Dsena says your fans wont let you down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.