'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:32 AM2024-09-17T10:32:41+5:302024-09-17T10:32:59+5:30

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १७' संपल्यापासूनच पुढच्या सीझनची प्रेक्षक वाट पाहात होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण, सलमान खान 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे.

bigg boss 18 after bigg boss marathi new hindi season of salman show is comming soon watch promo | 'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास

'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास

Bigg Boss : छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाचा 'बिग बॉस मराठी'चा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. 'बिग बॉस मराठी'चा होस्ट बदलण्यापासून ते सदस्यांपर्यंत चाहत्यांना अनेक आश्चर्याचे धक्के मिळाले. आता मराठीपाठोपाठ 'बिग बॉस हिंदी'चाही नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'बिग बॉस १७' संपल्यापासूनच पुढच्या सीझनची प्रेक्षक वाट पाहात होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण, सलमान खान 'बिग बॉस'चा नवा सीझन घेऊन येत आहे. 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. कलर्सच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन सलमानच्या आवाजातील 'बिग बॉस'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. "बिग बॉस देखेंगे घरवालों का फ्युचर...अब होगा टाइम का तांडव" असं या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे. 


या प्रोमोवरुन यंदाच्या 'बिग बॉस'च्या सीझनची थीम ही टाइम ट्रॅव्हलवर आधारित असणार आहे. "होगी एंटरटेनमेंट की पूरी विश...जब टाइम का ट्रॅव्हल लेकर आयेगा बिग बॉस मे एक नया ट्विस्ट", असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला गेला आहे. या प्रोमोमुळे बिग बॉसच्या नव्या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Web Title: bigg boss 18 after bigg boss marathi new hindi season of salman show is comming soon watch promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.