Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 02:59 PM2024-10-10T14:59:55+5:302024-10-10T15:01:59+5:30

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांच्यावर नॉमिनेशची टांगती तलवार आहे. 

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte nominatted with karan veer mehra chahat pandey avinash mishra and muskan | Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंनी घरात त्यांचा दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांच्यावर नॉमिनेशची टांगती तलवार आहे. 

बिग बॉस १८ मध्ये पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य नुकतचं पार पडलं. या नॉमिनेशन कार्यात अभिनेता करण वीर मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं. त्यामुळे सदावर्ते आणि करणमध्ये वादही झाला. सदावर्ते यांच्याबरोबरच चाहत पांडे, करण वीर मेहरा, मुस्कान बामने, अविनाश मिश्रा हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात सदावर्ते घराबाहेर जाणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


गुणरत्न सदावर्ते पहिल्या दिवसापासूनच घरात टिकून राहण्यासाठी आणि चर्चेत येण्यासाठी त्यांच्या स्टाइलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बिग बॉसच्या घरात सदावर्तेंनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यापासून ते माझा एन्काऊंटर होणार होता, असे खुलासे सदावर्तेंनी केले आहेत. 

Web Title: Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte nominatted with karan veer mehra chahat pandey avinash mishra and muskan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.