'सनम मेरे सनम...', गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स; पत्नीचं नाव घेत बिग बॉसने केली चेष्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:38 PM2024-10-15T12:38:10+5:302024-10-15T12:39:05+5:30

सदावर्ते आणि शिल्पा शिरोडकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte romantic dance with shilpa shirodkar | 'सनम मेरे सनम...', गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स; पत्नीचं नाव घेत बिग बॉसने केली चेष्टा

'सनम मेरे सनम...', गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स; पत्नीचं नाव घेत बिग बॉसने केली चेष्टा

बिग बॉस १८ (Bigg Boss 18) मध्ये सध्या अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सगळ्यांचं मनोरंजन करत आहेत. त्यांची आणि शिल्पा शिरोडकरची (Shilpa Shirodkar)  जोडी तर लोकांना खूपच आवडत आहे. नुकतंच दोघंही रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसले. तर सारा त्यांना डान्स शिकवत होती. सदावर्ते आणि शिल्पा शिरोडकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बिग बॉसच्या पेजवर गुणरत्न सदावर्ते आणि शिल्पा शिरोडकरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 'सनम मेरे सनम' या गाण्यावर ते डान्स करत आहेत. सदावर्ते हे शिल्पाचे चाहते असल्याचं त्यांनी आधीच मान्य केलं होतं. त्यामुळे आता या रोमँटिक डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यांच्यासोबत सारा देखील आहे. सारा मध्येच येत सदावर्तेंचा हात शिल्पाची कंबरेवर ठेवते. तेव्हा सदावर्ते हात काढतात आणि हसायला लागतात. 'सारा काय करते यार तू' असं सदावर्ते साराला म्हणतात. यानंतर तिघांमध्येही एकच हशा पिकतो. 

दोघांचा हा डान्स सुरु असताना बिग बॉसही त्यांची मजा घेतात. ते म्हणतात,'तुम्ही खूप सुंदर परफॉर्मन्स दिला. तुमच्या पत्नी जयश्रीलाही हा डान्स आवडेल. फक्त एक लक्षात ठेवा की जयश्री यांनी चुकून शिल्पावर केस केली तर तुम्हाला शिल्पाच्या बाजूने केस लढावी लागेल." हे ऐकून सदावर्तेही हो असं म्हणतात.

दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचीही चर्चा आहे. हायकोर्टातील एका प्रलंबित केससाठी ते अनुपस्थित राहिल्याने कोर्टाने नाराजी दर्शवली आहे. त्यामुळेच त्यांना केससाठी बाहेर यावं लागलं आहे. नंतर ते पुन्हा घरात जातील अशीही चर्चा आहे.

Web Title: Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte romantic dance with shilpa shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.