Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:57 PM2024-10-09T12:57:59+5:302024-10-09T13:00:35+5:30

सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करत आहे. एवढेच नाही, तर अनेक लोक या शोला सलमान खानचा शो म्हणूनही संबोधतात. तर जाणून घेऊयात, या सीझनसाठी सलमान खान किती फीस घेतोय यासंदर्भात...

Bigg Boss 18 salman khan became highest paid tv host charges rs 60 crores for per month likely to earn ₹260 crore | Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!

Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!

रिॲलिटी शो बिग बॉसच्या सीझन 18 ला सुरुवात झाली आहे. हा शो सुरू होऊन अद्याप केवळ 2-3 दिवसच झाले आहेत आणि यात वाद व्हायलाही सुरुवात झाली आहे. घरात एन्ट्री होताच कंटेस्टेंट आपसात भिडू लागले आहेत. बिग बॉसमध्ये अनेक ट्विस्ट यायलाही सुरुवात झाली आहे. या ट्विस्टमुळे अनेक लोक हा शो बघणे पसंत करतात. 

मात्र, बिग बॉस सलमान खानच्या वीकेंड वारशिवाय अपूर्ण आहे. यात तो कंटेस्टंटचा क्लास घेताना दिसतो. मात्र, हा शो होस्ट करण्यासाठी सलमान खान किती मोठी  रक्कम घेत आहे, हे आपल्याला माहीत आहे का? यामुळे तो आता टीव्हीवरील सर्वात महागडा होस्ट बनला आहे.

सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करत आहे. एवढेच नाही, तर अनेक लोक या शोला सलमान खानचा शो म्हणूनही संबोधतात. तर जाणून घेऊयात, या सीझनसाठी सलमान खान किती फीस घेतोय यासंदर्भात...

सलमान खानची फीस -
हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तानुसार, सलमान खान बिग बॉसच्या एक महिन्यासाठी तब्बल 60 कोटी रुपये एवढी फीस घेतो. हो केवळ एकाच महिन्यात सलमान खान बिग बॉसमधून एवढी मोठी रक्कम छापतो. माध्यमांतील वृत्तांनसुसार सलमान खानने गेल्या सिझनच्या तुलनेत या सीझनमध्ये आपली फीस वाढवली आहे. 

जर बीग बॉस 15 आठवड्यांपर्यंत चालले तर सलमान खान एकूण 260 कोटी रुपये घरी घेऊन जाईल. महत्वाचे म्हणजे, सलमान खान 2010 पासूनच बिग बॉस होस्ट करतो. 
 

Web Title: Bigg Boss 18 salman khan became highest paid tv host charges rs 60 crores for per month likely to earn ₹260 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.