Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:52 AM2024-10-20T08:52:22+5:302024-10-20T08:53:39+5:30
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक झालेला दिसला. काय घडलं नेमकं? जाणून घ्या (salman khan, bigg boss 18)
Bigg Boss 18 ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. सलमान खान Bigg Boss 18 चं सूत्रसंचालन करतोय. सलमान खान गेल्या आठवड्यात बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याने वीकेंड का वारला उपस्थित नव्हता. सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोईंकडून धमकी मिळाली. त्यामुळे घबराटीचं वातावरण होतं. अशातच काल चोख बंदोबस्तात सलमानने Bigg Boss 18 चं सूत्रसंचालन केलं. त्यावेळी बोलताना सलमानच्या मनातलं दुःख बाहेर आलं.
सलमान खानने सांगितलं मनातलं दुःख
Bigg Boss 18 च्या सेटवर शिल्पा शिरोडकरला समजावताना सलमान म्हणाला, "भावनेच्या आधारावर या घरात कोणतंही नातं होता कामा नये. मला आज इथे यायचं नव्हतं. परंतु वर्क कमिटमेंट आहे. एक काम आहे जे करावं लागणार आहे. मला तुम्हालाही भेटायचं नव्हतं. मला यायचं नसूनही यावं लागलं. जर कोणावर भलंमोठं लांच्छन लागत असेल तर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल?"
Salman Khan says Aaj mujhe yahan (set) pe aana hi nahi tha, lakin ek aadmi ko kuch karna padta hai, toh karna padta hai.pic.twitter.com/t789I77NjF
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 19, 2024
सलमान खान पुढे म्हणाला, "माझ्यावरही अनेक लांच्छन लावण्यात आले आहेत. यावेळी कसं वाटतं मला माहितीये. माझ्या आई-वडिलांवर काय परिणाम होतो याचीही मला जाणीव आहे. त्यांना खूप काही सहन करावं लागतं. मी कोणा वेगळ्या व्यक्तीचा अनुभव सांगत नाहीय. तर माझा स्वतःचा अनुभव सांगतोय." अशाप्रकारे सलमान खानने त्याच्या मनातली खंत आणि भावना Bigg Boss 18 च्या सदस्यांसमोर व्यक्त केली.