'Bigg Boss 18' च्या स्पर्धकांची नावे वाचून बसेल धक्का, एक तर आहे लोकप्रिय अभिनेत्रीचा पती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 03:13 PM2024-09-10T15:13:15+5:302024-09-10T15:14:36+5:30

नुकतंच सलमान खानने 'बिग बॉस' 18 चा प्रोमो शूट केला असल्याचं समोर आलं आहे.  प्रोमो अवघ्या काही दिवसात रिलीज होणार आहे.

Bigg Boss 18 Salman Khan Rumoured Contestants Names | Actress Shilpa Shetty husbund Raj Kundra | 'Bigg Boss 18' च्या स्पर्धकांची नावे वाचून बसेल धक्का, एक तर आहे लोकप्रिय अभिनेत्रीचा पती!

'Bigg Boss 18' च्या स्पर्धकांची नावे वाचून बसेल धक्का, एक तर आहे लोकप्रिय अभिनेत्रीचा पती!

Bigg Boss 18 Salman Khan : 'बिग बॉस'  18 (Bigg Boss 18) ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच सलमान खानने 'बिग बॉस' 18 चा प्रोमो शूट केला असल्याचं समोर आलं आहे.  प्रोमो अवघ्या काही दिवसात रिलीज होणार आहे. 'बिग बॉस' 18 कधीपासून सुरु होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण, यात कोण स्पर्धक सहभागी होणार, याबद्दल काही नावांची चर्चा सुरू आहे. एक स्पर्धक तर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती आहे. ज्याचे नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल. अर्थात ही नावे जवळपास पक्की असल्याचं बोललं जात आहे. तर ते स्पर्धक कोण आहेत, हे आपण जाणून घेऊया. 

यंदा 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची  यादी समोर आली आहे. यामध्ये एका लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रादेखील  (Raj Kundra)सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.  असे झाले तर यावेळचा बिग बॉस  नक्कीच खूप धमाकेदार होणार आहे. राज कुंद्रा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. पण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दैनिक जागरणने याबाबत बातमी दिली आहे. 



संभाव्य स्पर्धकांमध्ये राज कुंद्रा, सुधांशू पांडे, अनिता हसनंदानी, जान खान, धीरज धुपर, मीरा देवस्थळे, सुरभी ज्योती, अलिशा पनवार, शाहीर शेख, फैसल शेख, समीरा रेड्डी, अंजली आनंद, चाहत पांडे, रीम शेख, सुनील कुमार, यांच्यासह यूट्यूबर मॅक्सटर्न आणि ठगेश यांच्याही  नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

नवीन सीझन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कलर्स टीव्हीवर प्रसारित होण्याची शक्यता आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करेल.  ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे.  तसेच अजय देवगणच्या  'सिंघम अगेन'मध्येदेखील सलमानचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे, पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय तो आगामी 'द बूल' मध्येही दिसणार आहे. 

Web Title: Bigg Boss 18 Salman Khan Rumoured Contestants Names | Actress Shilpa Shetty husbund Raj Kundra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.