"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 11:22 IST2024-10-14T11:21:04+5:302024-10-14T11:22:13+5:30
'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन वकील गुणरत्न सदावर्ते गाजवत आहेत.

"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!
Gunaratna Sadavarte : एकीकडे 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन संपला तर दुसरीकडे 'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन सुरू झाला. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांमुळे गुणरत्न सदावर्ते यांचं नाव कायमच चर्चेत राहिलं आहे. आता देशभरात गुणरत्न सदावर्ते यांची चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस'च्या घरातही अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांची स्टाईल, बोलण्याची शैलीने प्रेक्षकांचं तर मनोरंजन होतच आहे, पण, सेलिब्रिटीही प्रभावित झाले आहेत.
नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात पार पडलेल्या 'विकेंड का वार'ला अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता राजकुमार राव यांनी उपस्थिती लावली. यावेळी तृप्ती आणि राजकुमार हे दोघांनीही गुणरत्न सदावर्ते यांच्याशी गप्पा मारल्या. तृप्ती डिमरी हिने त्यांना प्रश्न केला की, तुम्ही कोर्टातही असेच बोलता का?. यावर उत्तर देत सदावर्ते म्हणाले, "ही तर माझी स्टाईल आहे. कोर्टाच्या पुढच्या तारखेला येऊन माझी ही भूमिका येऊन बघा. डंके की चोट पे भरोसा रखो इस काले कोट पे...". त्यांचं हे उत्तर ऐकून सर्वंच जण खळखळून हसले.
पहिल्या दिवसापासूनच गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेताच आपल्या हटके स्टाइलने त्यांनी सलमान खानचीही बोलती बंद केली होती. गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला त्यांनी केलेला विरोध असो किंवा एसटी आंदोलन. ते कायम लोकांच्या नजरेत असतात. आता बिग बॉसच्या घरात ते काय खेळ खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.