गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:38 PM2024-10-09T15:38:22+5:302024-10-09T15:39:20+5:30
'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते हे प्रेक्षकांचंही पुरेपूर मनोरंजन करत आहेत.
'मराठी बिग बॉस' संपले असले तरी मनोरंजन मात्र थांबलेले नाही.'बिग बॉस हिंदी' सीझन १८ सुरु झाला आहे. या शोमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांमुळे गुणरत्न सदावर्ते यांचं नाव कायमच चर्चेत राहिलं आहे. आता देशभरात गुणरत्न सदावर्ते यांची चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते हे प्रेक्षकांचंही पुरेपूर मनोरंजन करत आहेत.
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेतलं आहे. ते एकानंतर एक 'बिग बॉस'च्या घरातील नियम मोडताना दिसून येत आहेत. नुकतंच एक प्रोमोसमोर आला आहे. ज्यामध्ये हेमा यांना एक नंबर सदावर्ते सांगतात आणि तो नंबर हेमा या लिहून घेतात. पण, बिग बॉसच्या घरात काहीही लिहण्यास मनाई आहे. त्यामुळे हेमा आणि सदावर्ते यांनी बिग बॉसचा महत्त्वाचा नियम मोडला आहे.
एवढंच नाही तर याआधीही सदावर्तेंनी 'बिग बॉस'च्या घरातला महत्त्वाचा नियम मोडला होता. गुणरत्न सदावर्ते हे 'बिग बॉस'च्या घरातील सोफ्यावर डाराडूर झोपले होते. त्यांना झोपलेले पाहून 'बिग बॉस'ने कोंबडा आरवला. इतर सदस्यांनीही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण, सदावर्ते काही उठले नाही. याचा एक व्हिडिओही समोर आला होता.
'बिग बॉस'च्या घरातला महत्त्वाचा एक नियम आहे. तो म्हणजे कोणत्याही स्पर्धकाला दिवसा झोपता येत नाही. 'बिग बॉस'च्या घरातल्या लाइट्स जोपर्यंत सुरू असतात तो पर्यंत कोणताही स्पर्धक घरात झोपू शकत नाही. जर कोणता सदस्य झोपलाच तर त्याच्यासाठी घरात कोंबडा आरवला जातो. शिवाय, दिवसा झोपल्यास सदस्यांना बिग बॉस शिक्षा सूनावतात.
पहिल्या दिवसापासूनच सदावर्ते बिग बॉसच्या घरात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. नॉमिनेशन टास्कमध्येही त्यांनी राडा केल्याचं पाहायला मिळालं. गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेताच त्यांच्या हटके स्टाइलने सलमान खानचीही बोलती बंद केली होती. गुणरत्न सदावर्ते हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला त्यांनी केलेला विरोध असो किंवा एसटी आंदोलन. ते कायम लोकांच्या नजरेत असतात. आता बिग बॉसच्या घरात ते काय खेळ खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.