Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 01:15 IST2025-01-20T01:14:37+5:302025-01-20T01:15:26+5:30

करणवीर मेहरानं 'खतरों के खिलाडी १४'नंतर आता 'बिग बॉस १८'चीही ट्रॉफी उचलत इतिहास घडवला आहे.

Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra lifts the trophy takes Rs 50 lakh home beating Vivian Dsena | Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी

Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी

Bigg Boss 18 Winner: 'बिग बॉस १८' फिनालेचा विजेता घोषित झाला आहे.  करणवीर मेहरा (Karan Veer Mehra) आणि विवियन डिसेना (Vivian Dsena) यांच्यात चुरस होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रेक्षकांनी करणवीर मेहराला जास्त वोट देत विजेता केलं आहे. 

सलमान खानने करणवीर मेहराचा हात वर करत त्याला विजेता घोषित केलं. विशेष म्हणजे करणवीर मेहरानं 'खतरों के खिलाडी 14'चीही ट्रॉफी पटकावली होती. 'खतरों के खिलाडी 14'नंतर आता 'बिग बॉस १८'ची ट्रॉफीदेखील उचलत त्यानं इतिहास घडवला आहे. करणवीर मेहरा हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमध्ये एक स्ट्राँग स्पर्धक राहिला. त्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ होती. याचाच रिझल्ट म्हणजे प्रेक्षकांनी त्याला भरभरुन वोट दिले.  करणवीरला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे बक्षीस रक्कम म्हणून ५० लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. 


'बिग बॉस १८'च्या (bigg boss 18) ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार पार पडला आहे. 'बिग बॉस'च्या टॉप ६ मध्ये अभिनेता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि रजत दलाल पोहचले होते. पहिल्या फेरीत ईशा सिंह बाहेर पडली. 'स्काई फोर्स' चित्रपटाच्या निमित्ताने वीर पहारिया 'बिग बॉस १८'च्या घरात पोहोचला होता. यावेळी वीरच्या हातून मिशन एलिमिशन पार पडलं. 

'बिग बॉस १८'च्या ग्रँड फिनालेमध्ये 'सेलिब्रिटी शेफ'च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री अंकिता लोंखडे, मन्नारा चोप्रा, विकी जैन, एल्विश यादव आणि अभिषेक शर्मा हे पोहचले होते. यानंतर  'लव्हयापा' सिनेमाची टीम अर्थात अभिनेता जुनैद खान, खुशी कपूर पोहचले होते. यावेळी जुनैद आणि खुशीनं टॉप-३ सदस्य जाहीर केले. ईशा सिंह, चुम दरांगपाठोपाठ अविनाश मिश्रा एविक्ट झाला. जुनैद खान, खुशी यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता आमिर खान यानेदेखील ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी सलमान आणि आमिरची जुगलबंदी पाहायला मिळाली. अविनाश मिश्रा एविक्ट झाल्यानंतर विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल हे टॉप ३ मध्ये पोहचले होते. अखेर रजत दलाल कमी मतं मिळ्यानं ट्रॉफी उचलण्याचं त्याच स्वप्न भंगलं. अखेर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात करणवीरने बाजी मारली. 


'बिग बॉस १८'चा प्रिमियर हा ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसारित झाला होता. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे स्पर्धक म्हणजे करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरंग, मुस्कान, शिल्पा शिरोडकर, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा,  एलिस कौशिक, सारा खान, अरफीन खान, हेमलता शर्मा, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन राज, तेजिंदर पाल सिंग बग्गा, गुणरत्न सदावर्ते, शहजादा धामी, ईशा सिंग आणि रजत दलाल. तर काही स्पर्धकांना 'बिग बॉस'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळाली होती. सर्वप्रथम, दिग्विजय राठी आणि कशिश कपूर यांनी प्रवेश केला. यानंतर एडन रोज, यामिनी मल्होत्रा ​​आणि अदिती मिस्त्री यांनी एन्ट्री घेतली होती. 
 

Web Title: Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra lifts the trophy takes Rs 50 lakh home beating Vivian Dsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.