Bigg Boss 2020 : कुमार सानू यांच्या मुलाची बिग बॉस २०२० मध्ये होणार एन्ट्री, वडिलांप्रमाणेच आहे तो गायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:37 AM2020-08-21T11:37:31+5:302020-08-21T11:40:35+5:30
Bigg Boss 2020 : जान हा वडील कुमार सानू यांच्यासोबत राहत नाही. पण तो वडिलांच्या पावलावर पाउल देत संगीताच्या विश्वास आपलं नाव करण्यासाठी प्रयत्नात आहे.
बिग बॉसच्या गेल्यावर्षीच्या सीझनमध्ये बघायला मिळालं की, या शोमध्ये गायकांनीही एन्ट्री घेतली आहे. यावेळी बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू कुमार हा सहभागी होणार आहे. जानचं वय २६ वर्षे असून त्याचं खरं नाव जायेश भट्टाचार्य आहे. पण तो त्याच्या वडिलांचं नाव लावतो. जान हा एक ट्रेन्ड क्लासिकल गायक आहे आणि कुमार सानू यांची पहिली पत्नी रीताचा मुलगा आहे. जान हा वडील कुमार सानू यांच्यासोबत राहत नाही. पण तो वडिलांच्या पावलावर पाउल देत संगीताच्या विश्वास आपलं नाव करण्यासाठी प्रयत्नात आहे.
जान कुमार सावू बालपणापासूनच गाणं गातो आणि त्याने 'तारे जमीं पर' सिनेमातील 'बम बम बोले' गाण्याला आपला आवाज दिलाय. तसेच त्याने बंगाली सिनेमातही गाणी गायली आहेत. अधिकृतपणे त्याचं गायनाचं करिअर २०१६ मध्येच सुरू झालं होतं. नुकतंच यूट्यूबवर त्याचं तू सांडली हे गाणंही रिलीज झालंय.
बिग बॉस २०२० मध्ये जान सानू कुमारसोबतच सारा गुरपाल, निया शर्मा, जॅसमीन भसीन, पवित्र पुनिया आणि नैना सिंहसारखे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अभिनेत्री जेनिफर विंगेटलाही या शोची ऑफर देण्यात आली होती. पण तिने नाकारली. बिग बॉसचं १४ वं सीझन सप्टेंबरमध्ये सुरू होणार असं बोललं जात आहे. पण अजून सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची संपूर्ण यादी समोर आलेली नाही.
तसेच भाभीजी घर पर है मालिकेतील अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या टंडन हिने मालिका सोडली आहे. त्यामुळे ती बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा सुरू होती. पण तिने ही केवळ अफवा असल्याचे सांगितले. त्यासोबतच रामानंद सागर यांची पणती साक्षी या शोमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे.
हे पण वाचा :
जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर...
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, 12 वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर