चार वर्षानंतर बॉयफ्रेंडसोबत 'बिग बॉस' फेम सारा खानचं झालं ब्रेकअप, पोस्ट शेअर करत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:30 AM2023-12-14T09:30:44+5:302023-12-14T09:33:49+5:30
बिग बॉस फेम सारा खानचं ब्रेकअप झालं आहे.अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटींच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.असीम रियाज-हिमांशी खुराना, माहिरा शर्मा-पारस छाबरा, बंदगी कालका-पुनीश शर्मा यांच्यानंतर आता बिग बॉस फेम सारा खानचं ब्रेकअप झालं आहे. अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
सारा खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका पोस्टमध्ये ब्रेकअपची झाल्या माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये साराने लिहिले की, "परस्पर संमतीने मी आणि माझ्या जोडीदाराने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून जाऊ. पण तरीही आमच्या मनात एकमेकांनाबद्दल तेवढाच समान आणि आदर कायम राहिल. माझी गोष्ट समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.."
सारा खानचा बॉयफ्रेंड शंतनू राजे हा पायलट आहे. अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून शंतनूला डेट करत होती. रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्न करणार होते. पण आता या कपलचा मार्ग वेगळे झाले आहेत. गेल्यावर्षी दिलेल्या मुलाखतीत साराने सांगितले होते की ती लवकरच शंतनूसोबत लग्न करणार आहे. तिने शंतनूला आपला उत्तम जोडीदार असल्याचंही म्हटले होते.
याआधी सारा खान बिग बॉसच्या घरात अभिनेता अली मर्चंटच्या प्रेमात पडली होती. दोघांनीही तिथेच लग्न केले. पण शोमधून बाहेर आल्यानंतर तिचे लग्न तुटले आणि दोघे वेगळे झाले.
सारा खान ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं २००७ साली मिस भोपाळ हा किताब जिंकला होता. स्टार प्लसवरील 'सपना बाबूल का...'बिदाई' या मालिकेत तिनं साधनाची भूमिका साकारली असून ती लोकांच्या खूप पसंतीच पडली होती. 'बिदाई' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली साराला आजही साधना म्हणूनच चाहते ओळखतात.