बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना मिळाला हा फिटनेसगुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:07 AM2018-04-18T09:07:26+5:302018-04-18T14:37:26+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून कोण नाश्ता बनवतं, तर कोणी योगासने करतं... तर कोणी exercise करतं. बिग बॉस ...
ब ग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून कोण नाश्ता बनवतं, तर कोणी योगासने करतं... तर कोणी exercise करतं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील सगळेच कलाकार फिटनेस फ्रिक असल्याचे दिसून येत आहे. कारण अनेक स्पर्धक योगा आणि व्यायाम करताना दिसतात. या सगळ्या स्पर्धकांचा गुरू सगळ्यांचा लाडका अभिनेता राजेश शृंगारपुरे आहे. कारण सकाळीच फिटनेस गुरू राजेश शृंगारपुरे घरातल्या इतर मंडळीना १०० दिवस कसे फिट राहावे याचा कानमंत्र देताना दिसले. तसेच, कालपर्यंत मिक्सरची मागणी करणाऱ्या घरातल्या बायकांना बिग बॉसने आज पाटा-वरवंटा देऊन सरप्राईज दिलं, याचा जुई गडकरीने पुरपूर फायदा उठवत जेवणासाठी वाटण वाटले आणि आजच्या तरुण मुलींसमोर उदाहरण ठेवले. बऱ्याच दिवसांनी जुई गडकरीने या कार्यक्रमामुळे पाटा-वरवंटा वापरला.
घरामध्ये फिटनेसची रेसिपी रंगत असताना तिकडे आत घरात आरती आणि उषाताई यांच्यात चपात्या बनवण्यावरून खटके उडत होते. याचा परिणाम उषाताई चपात्या न बनवता निघून गेल्या. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये उषाजींना नॉमिनेट केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी घरातील इतर सदस्यांना टोंबणे मारण्यास सुरुवात केली. घरातील सगळ्यांना माझी भीती वाटते म्हणूनच मला नॉमिनेट केले, असा त्यांनी घरच्या सदस्यांवर आरोप लावला.
बिग बॉस घरात आता नॉमिनेट प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. या नॉमिनेट प्रक्रियेसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा करणार असून, या कार्यानुसार नॉमिनेट सदस्यांना सदइच्छा देण्यासाठी हा यज्ञ आहे. तसेच घरामध्ये रहाणाऱ्या रहिवाश्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल सदइच्छा असणे खूप महत्वाचे आहे असे बिग बॉसचे म्हणणे असल्या कारण्याने या यज्ञामध्ये प्रत्येक रहिवाश्याला सहभागी होणे अनिवार्य असणार आहे. या यज्ञ कुंडातील अग्नी अखंड प्रज्वलित राहाणे अनिवार्य आहे. जर तो विझला तर हे कार्य असफल मानण्यात येणार आहे. तेव्हा हे बघणे रोमांचक असणार आहे की, घरातील रहिवाशी कसे हा टास्क पूर्ण करतील? त्यांना यात कोणत्या अडचणी येतील? आणि ते त्यावर ते कसे मार्ग काढतील... जोपर्यंत बिग बॉसचा आदेश येत नाही तो पर्यंत हे कार्य सुरू राहाणार आहे.
Also Read : बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन