बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 01:26 PM2024-10-12T13:26:06+5:302024-10-12T13:29:49+5:30

बिग बॉस आपल्या करियरचा भाग झाल्यानंतर करियरवर कसा परिणाम, फायदा होतो याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

bigg boss effect on career push actor karanvir bohra reveals the truth about salman khan | बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....

बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....

बिग बॉसच्या १८व्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान बिग बॉस आपल्या करियरचा भाग झाल्यानंतर करियरवर कसा परिणाम, फायदा होतो याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेता करणवीर बोहरा याने कोईमोईला दिलेल्या मुलाखतीत यावर मौन सोडलं आहे. करणवीरला जेव्हा विचारण्यात आलं की, बिग बॉसमुळे करिअरवर परिणाम होतो का? तेव्हा त्याने "नाही, अजिबात नाही "असं उत्तर दिलं.

अभिनेत्याने करियर पुश म्हणजे काय? हे देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तुमचं करिअर काय आहे यावर ते अवलंबून आहे, असं त्याने स्पष्ट केलं. जर तुम्ही म्युझिक व्हिडीओ बनवत असाल किंवा फक्त पैसे कमवण्यासाठी रँडम शो करत असाल, तर हो तुम्हाला नक्कीच त्यातून पुश मिळेल. त्यांच्यासाठी हे निश्चितच चांगलं व्यासपीठ आहे. पण जर तुम्हाला अभिनेता व्हायचं असेल तर इथून कोणतीही मदत मिळणार नाही असं त्याने सांगितलं. 

करणवीर बोहरा बिग बॉस, लॉक अप सारख्या आणखी एका रिॲलिटी शोचा भागही आहे. या शोमध्ये सहभागी होण्याचा मला कोणताही पश्चाताप नसल्याचंही त्याने सांगितलं. त्याने केलेल्या कामाचा आनंद असल्याचं तसेच आपण जे काही केलं आहे, त्यातून काहीना काही शिकल्याचं सांगितलं. 

"पाहा, जर आपण दीर्घकाळाबद्दल बोललो तर ते माझ्यासाठी चांगलं आहे. कारण एकतर मला पैसे मिळतात किंवा काहीतरी धडा मिळतो. मी काही कमावलं, काही शिकलो आणि काही साध्य केलं आहे. त्यामुळे पश्चाताप होत नाही" असं करणवीरने म्हटलं आहे. बिग बॉस १२ व्या सीझनचा भाग असलेला करणवीर बोहरा दर आठवड्याला २० लाख रुपये कमवत होता. करणवीर हा शोचा फायनलिस्ट होता.
 

Web Title: bigg boss effect on career push actor karanvir bohra reveals the truth about salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.