लग्नाच्या पाच वर्षांनी 'बिग बॉस' फेम कपल झाले आईबाबा, गोंडस बाळाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:59 PM2023-10-04T15:59:34+5:302023-10-04T16:00:01+5:30

'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत दिली माहिती

bigg boss fame couple rochelle rao and Keith Sequeira blessed with baby girl after five years of marriage | लग्नाच्या पाच वर्षांनी 'बिग बॉस' फेम कपल झाले आईबाबा, गोंडस बाळाला दिला जन्म

लग्नाच्या पाच वर्षांनी 'बिग बॉस' फेम कपल झाले आईबाबा, गोंडस बाळाला दिला जन्म

googlenewsNext

'बिग बॉस ९'मधून घराघरात पोहोचलेलं लाडकं कपल म्हणजे कीथ सिकेरा आणि रोशेल राव. काही महिन्यांपूर्वीच कीथ आणि रोशेलने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रोशेलच्या मॅटर्निटी फोटोशूटचीही प्रचंड चर्चा रंगली होती. रविवारी (१ ऑक्टोबर) रोशेलने गोंडस बाळाला जन्म दिला. रोशेल आणि कीथ यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली आहे. 

रोशेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने "देवाने आम्हाला आज खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. १ ऑक्टोबरला सिकेरा या आमच्या गोंडस मुलीने जन्म घेतला. आम्हाला नेहमीच मुलगी हवी होती. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद", असं म्हटलं आहे. 

अनुष्काच्या प्रेगन्सीच्या चर्चांदरम्यान विराट कोहलीची पोस्ट; अभिनेत्री म्हणाली, "मला कोणीही..."

लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नाला श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली, "शेजारच्या काकू..."

रोशेलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. कीथ आणि रोशेल 'बिग बॉस ९' मध्ये सहभागी झाले होते. तिथेच त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. २०१८ साली त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. 
 

Web Title: bigg boss fame couple rochelle rao and Keith Sequeira blessed with baby girl after five years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.