गावाकडचं घर कौलारु! 'बिग बॉस'फेम विकास पाटीलचं गावचं घर पाहिलं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:33 PM2023-05-21T12:33:45+5:302023-05-21T12:34:37+5:30
Vikas patil: विकास पाटील मुळचा कोल्हापुरचा असून कोल्हापूर जवळ असलेल्या गलगले या गावी त्याने आलिशान छान असं बैठंघर बांधलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील (vikas patil). हा शो संपल्यानंतर विकासचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट् जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. मुंबईत स्थित असलेल्या विकासने अलिकडेच त्याच्या गावी टुमदार घर बांधलं आहे. या घराचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विकास पाटील मुळचा कोल्हापुरचा असून कोल्हापूर जवळ असलेल्या गलगले या गावी त्याने आलिशान छान असं बैठंघर बांधलं आहे. या घराचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच छानसं कॅप्शनही दिलं आहे.
"कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजे निमित्ताने माझ कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं,छान वेळ देता आला. गाव आणि गावाकडच्या गोष्टींची बातच निराळी!", असं कॅप्शन देत विकासने त्याच्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, विकास मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'अधुरी एक कहानी' या मालिकेतून टीव्ही विश्वात पाऊल टाकले. त्यानंतर 'बायको अशी हवी', 'अंतरपाट', 'कुलवधू', 'माझीया माहेरा', 'लेक माझी लाडकी', ' वर्तुळ ' या मालिकेत त्याने काम केलं.