अभिनयासह पाककलेतही निपूण आहे विशाल निकम; बेसनाचे लाडू वळतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 13:29 IST2023-11-14T13:29:05+5:302023-11-14T13:29:53+5:30
Vishal nikam: विशालने इन्स्टाग्रामवर त्याचा लाडू वळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनयासह पाककलेतही निपूण आहे विशाल निकम; बेसनाचे लाडू वळतानाचा व्हिडीओ व्हायरल
दिवाळी असल्यामुळे सध्या सगळीकडेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या कुटुंबासह हे उत्साहाचे दिवस साजरे करत आहेत. यामध्येच बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम (vishal nikam) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क दिवाळीचा फराळ करताना दिसत आहे. विशालने त्याच्या हाताने बेसनाचे लाडू केले आहेत.
विशाल सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तो पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडीही शेअर करत असतो. यात नुकताच त्याने बेसनाचे लाडू वळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विशालने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्यासमोर एका टबामध्ये बेसनाच्या लाडूचं पीठ ठेवलं असून तो एक-एक करत लाडू वळत आहे. इतकंच नाही तर त्याने बरेचसे लाडू वळले आहेत. विशेष म्हणजे विशाल अभिनयासह पाककलेतही निपूण असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.