Manipur Violence: 'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:28 AM2023-07-21T10:28:44+5:302023-07-21T10:29:50+5:30

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

bigg boss fame marathi actress ruchira jadhav post manipur woman paraded incident | Manipur Violence: 'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

Manipur Violence: 'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

googlenewsNext

देशाला हदरवून टाकणारी घटना मणिपूरमध्ये (Manipur Violence) घडली आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण देश सुन्न झाला असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. यामध्येच मराठी कलाविश्वातील  एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा राग व्यक्त केला आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत  संताप व्यक्त केला आहे.

काय आहे रुचिराची पोस्ट?

रोज अशा “छोट्या मोठ्या” घटना घडतात, आपल्या आजूबाजूला… आपल्या ऐकण्यात वा बघण्यात.. आपण ऐकतो, बघतो, तात्पुरतं रिअॅक्ट करतो आणि सोडून देतो. मग अशी एक घटना घडते जी आपल्याला हलवून टाकते. माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते. पण करायचं काय, हा प्रश्न उभा असतो. पुन्हा रिअॅक्ट होऊन सोडून द्यायचं… अजून काय…!! पण “शहाणपण” हे समजण्यात आहे की, या सगळ्याचं मूळ कुठे आहे. त्या “छोट्या मोठ्या” घटनेंकडेच आपण दुर्लक्ष केलं नाही ना, तर ही वेळच येणार नाही…
माझ्या बहिणींनो, स्वत:वर अन्याय होऊ देऊ नका. मग तो कितीही छोटा असो किंवा ती सो कॉल्ड “समाजमान्य” गोष्ट असो. तुमच्या विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करायला शिका.
काय आहे ना, Being Women काही गोष्टी “जन्मत:च” आपल्यावर लादल्या जातात. “Granted” घेतलं जातं. आपण ते सगळं मान्य करतो, “ही आपली चूक”
आपल्या बुद्धीला पडत असणारे प्रश्न आपण विचारत नाही..
“ही आपली चूक”
आपण अन्याय सहन करतो
“ही आपली चूक”
एक स्त्री म्हणून रोज नवीन प्रश्न पडतात. “पटतील” अशी उत्तर मात्र कुठेच सापडत नाहीत. आणि याला जबाबदार केवळ “पुरुषवर्ग” नाहीये हा.. याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने स्त्रीजातीला “गृहीत” धरलंय. हे थांबलं पाहिजे.
ruchira says I urge for EQUALITY कारण हेच “मूळ” आहे”, अशी पोस्ट रुचिरा जाधवने केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मणिपूरची राजधानी इंफाळपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. ४ मे रोजी ही घटना घडली. या महिलांची धिंड काढल्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी  खुरियम हिरो दास याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: bigg boss fame marathi actress ruchira jadhav post manipur woman paraded incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.